उत्तर प्रदेशमधील आयपीएस अधिकाऱ्याची अयोध्या धामवरची कविता व्हायरल

जाणून घ्या कोण आहेत रामलल्लाची ज्योत जागवणारे आयजी प्रवीण कुमार?


विशेष प्रतिनिधी

अयोध्या : अयोध्या रेंजचे वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि आयजी प्रवीण कुमार यांनी रामलल्लाला समर्पित कविता लिहिली आहे. यास त्यांनी आवाजही दिला आहे. रामलल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळ्यादरम्यान VIP मुव्हमेंट आणि भाविकांच्या सततच्या रांगा सांभाळण्यात आयजींनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. तर त्यांची ही कविता सोशल मीडियावर व्हायरल होत असून कौतुकाचा वर्षाव होत आहे.An IPS officers poem on Ayodhya from Uttar Pradesh has gone viral



2001 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी प्रवीण कुमार यांची प्रतिमा कडक पोलिस अधिकाऱ्याची आहे. तरी त्यांच्याकडे काव्यात्मक हृदय आहे. त्यांचा ‘देह मन मध्य तुखारे योग का’ हा नवा कवितासंग्रह या महिन्यात प्रकाशित झाला आहे. हे जीवनाच्या तत्त्वज्ञानावर लिहिलेले आहे, ज्याला 2021 चा हिंदी संस्थान पुरस्कार मिळाला आहे.

BITS पिलानी येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतलेल्या प्रवीण यांनी आओ अयोध्या धाम या कवितेतून रामनगरीचे अध्यात्म आणि ऐतिहासिकता वर्णन केली आहे. कवितेचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातील सौंदर्य आणि खोली आहे. आयजी प्रवीण कुमार यांच्या म्हणण्यानुसार, ही कविता लिहिण्यामागचा उद्देश पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना अयोध्येबद्दल जागरूक करणे आणि परंपरेनुसार प्रत्येक पाहुण्यांचे आदराने स्वागत करणे हा आहे.

‘आओ अयोध्या धाम’ या कवितेत आयजी प्रवीण कुमार यांनी राम मंदिरासह हनुमानगढी, कनक भवन यांचे वर्णनही केले आहे. यासोबतच पवित्र सरयू नदी, मणिपर्वत, अयोध्येचा आखाडा आणि घाट येथील आरतीलाही महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे.

An IPS officers poem on Ayodhya from Uttar Pradesh has gone viral

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात