प्रतिनिधी
बंगळुरू : कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभेची निवडणूक होत आहे, पण दरम्यानच्या काळात न्यायालयाने काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराला त्यांच्याच मतदारसंघात प्रवेश देण्यास नकार दिला आहे. कर्नाटकातील विशेष न्यायालयाने मंगळवारी (18 एप्रिल) काँग्रेस नेते विनय कुलकर्णी यांची धारवाडमध्ये प्रवेश करण्याची विनंती फेटाळून लावली. धारवाडमधून काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून विनय कुलकर्णी यांची घोषणा करण्यात आली आहे.An interesting case in Karnataka, these Congress candidates will not be able to go to their own assembly constituencies, read in detail…
सर्वोच्च न्यायालयाने कुलकर्णी यांना धारवाडमध्ये येण्यास बंदी घातली होती. 2016 मध्ये भाजप नेते योगेश गौडा यांच्या हत्येचा आरोप असलेल्या विनय कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाने धारवाड जिल्ह्यात प्रवेश दिला जाणार नाही या अटीवर जामीन मंजूर केला होता. लोकप्रतिनिधींचे विशेष न्यायालय असलेल्या अतिरिक्त शहर दिवाणी व सत्र न्यायालयाने कुलकर्णी यांच्या धारवाडमध्ये दाखल होण्याच्या याचिकेवर सोमवारी (17 एप्रिल) सुनावणी पूर्ण करून मंगळवारी निकाल दिला.
कोर्टात 90 साक्षीदारांचा मुद्दा
सीबीआयच्या वकिलांनी न्यायमूर्ती बी. जयंत कुमार यांच्या न्यायालयात विनय कुलकर्णी यांना धारवाडमध्ये प्रवेश देण्याच्या विरोधात युक्तिवाद केला होता. त्यात म्हटले की, खून प्रकरणातील 90 साक्षीदार धारवाडमध्ये राहत होते. कुलकर्णी यांची धारवाडमध्ये उपस्थिती खटल्यावर परिणाम करू शकते. सीबीआयच्या वकिलांनी सांगितले की, विनय कुलकर्णी हे प्रभावशाली व्यक्ती आहेत, त्यामुळे ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात. सर्व साक्षीदारांना सुरक्षा देणे शक्य नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले.
2021 मध्ये धारवाडमध्ये प्रवेशावर बंदी
11 ऑगस्ट 2021 रोजी विनय कुलकर्णी यांना जामीन मंजूर करताना सर्वोच्च न्यायालयाने आपल्या आदेशात धारवाडमध्ये प्रवेशबंदीची अट घातली होती. सीबीआयच्या वकिलांनी असेही म्हटले होते की, निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्यासाठी प्रतिनिधीची उपस्थिती आवश्यक नाही अशी तरतूद आहे. मात्र योगायोगाने कुलकर्णी यांनी मंगळवारी धारवाडमध्ये उमेदवारी दाखल केली.
विशेष न्यायालयात विनय कुलकर्णी यांच्या वतीने ज्येष्ठ वकील सीएच हनुमंतराय यांनी बाजू मांडली. जर काँग्रेस नेते साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकत असतील तर सीबीआय किंवा स्थानिक पोलीस साक्षीदारांना संरक्षण देऊ शकतात, असा युक्तिवाद त्यांनी केला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App