विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादीकडे आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, अजित पवार यांच्यासारखे नेते होते. परंतु, तरीदेखील सुप्रिया सुळे यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली नव्हती म्हणून राष्ट्रवादीकडे मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नव्हता हे शरद पवारांनी महाराष्ट्राला खरं सांगावं, अशा परखड शब्दांमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरी यांनी शरद पवारांना टोला हाणला.
2004 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता, असे वक्तव्य शरद पवारांनी लोकसत्ताला दिलेल्या मुलाखतीत केले त्यावर महाराष्ट्रामध्ये प्रतिक्रियांचे तरंग उमटले.
अमोल मिटकरी म्हणाले :
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री करायचे नव्हता की तुमच्याकडे खरंच उमेदवार नव्हता. आर. आर. पाटील, विजयसिंह मोहिते पाटिल, अजितदादा हे नेते तेव्हा होतेच. पण या पैकी कोणालाच मुख्यमंत्री करायचं नव्हतं, हे सत्य पवारांनी महाराष्ट्राला सांगावं. सरकार पाडेपर्यंत भूमिका कुणी घेतल्या?? पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री म्हणून लादले. उद्धव ठाकरे यांना अनुभव नसताना मुख्यमंत्री केलं. हे सगळं पवारांनीच केलं ना!!
मग सुप्रिया सुळेंची राजकीय कारकीर्द तेव्हा सुरु झाली नव्हती म्हणून 2004 मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार नव्हता, असं देखील पवारांनी सांगावे असा यांनी हाणला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App