आदित्य + सुप्रियांचे नेतृत्व लादण्याच्या मोहापायी शिवसेना + राष्ट्रवादी फुटली; अमित शाहांचा घणाघात!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने फोडण्याचा आरोप खोटा आहे. भाजपने हे दोन्ही पक्ष फोडले नाहीत. मुलगा आणि मुलीचे नेतृत्व आपल्याच नेत्यांच्या आणि कार्यकर्त्यांवर लादण्याच्या मोहापायी त्यांच्याच नेत्यांनी ते पक्ष फुटू दिले, अशी घणाघाती टीका केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. इंडिया टुडे कन्क्लेव्ह मध्ये बोलताना अमित शाह यांनी भाजप वरचा पक्ष फोडण्याचा आरोप पूर्णपणे फेटाळून लावला. Amit Shah on split in Shiv Sena, NCP in Maharashtra

महाराष्ट्रात दोन पक्ष फोडून आपल्याकडे ओढून घेतल्यानंतर भाजपचा परफॉर्मन्स काय राहील??, असा सवाल एंकर राहुल कंवल याने केला, त्यावर त्याला मध्येच थांबवून अमित शाह यांनी भाजप वरचा आरोप फेटाळून लावला.

शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस भाजपने फोडले असा आरोप बिलकुल करू नका. हे दोन्ही पक्ष भाजपने फोडलेले नाहीत. मुलाचे नेतृत्व आणि मुलीचे नेतृत्व आपल्या पक्षातल्या नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर लादण्याच्या मोहापायी हे दोन्ही पक्ष फुटले. उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरेंचे नेतृत्व शिवसेनेवर लादायचे होते. शरद पवारांना सुप्रिया सुळेंचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसवर लादायचे होते. ते त्या दोन्ही पक्षांच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मान्य नव्हते म्हणून त्यांचे पक्ष फुटले, अशा स्पष्ट शब्दांमध्ये अमित शाह यांनी भाजपवरचे आरोप फेटाळून लावले.

Amit Shah on split in Shiv Sena, NCP in Maharashtra

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात