केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची लोकसभेत धक्कादायक माहिती आणि आरोप
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : केरळच्या वायनाड परिसरामध्ये महाराष्ट्रातल्या माळीण सारखे दुर्घटना झाली. तिथे 2200 लोक वस्तीची चार गावे भूस्खलनामुळे वाहून गेली. दीडशेपेक्षा जास्त लोकांचे बळी गेले. केरळ सरकार आणि केंद्र सरकार आता तिथल्या ग्रामस्थांचे पुनर्वसन करण्याच्या कामाला लागले आहे, पण मूळातच केंद्र सरकारने अशा प्रकारच्या भूस्खलनाची शक्यता असल्याचा गंभीर इशारा केरळ सरकारला आठवडाभरापूर्वीच दिला होता, पण त्या सरकारने त्याकडे दुर्लक्ष केले, असा गंभीर आहोत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit shah) यांनी लोकसभेत बोलताना केला. Amit Shah in Lok Sabha
केंद्रीय गृहमंत्र्यांनी लोकसभेत केलेल्या या धक्कादारी खुलासामुळे केरळ सरकारचे गंभीर दुर्घटनेआधी झालेले दुर्लक्ष आता जनतेसमोर आले आहे.
कुठल्याही नैसर्गिक आपत्तीचा इशारा देणारी यंत्र भारतामध्ये विकसित स्वरूपात उपलब्ध आहे. जगात चार-पाच देश या तंत्रज्ञानाचा वापर करून तीन दिवस ते आठवडाभर आधी मुसळधार पाऊस, उष्णतेची लाट, भूस्खलन, समुद्राच्या भरती – ओहोटी, सुनामी यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे इशारा देऊ शकतात. भारत सरकार त्या प्रकारची यंत्रणा वापरून राज्य सरकारांना त्या संदर्भातली माहिती देत असते. काही राज्य सरकारी त्या माहितीचा उपयोग करून प्रतिबंधात्मक उपाय योजना वेळीच करतात. त्यामुळे मोठी जीवित आणि वित्त आणि टळू शकते. परंतु, केरळच्या वायनाडमध्ये घडलेल्या भूस्खलनाबाबतीत मात्र केंद्र सरकारने एक आठवडाभर आधी गंभीर इशारा देऊनही केरळच्या सरकारचे त्याकडे दुर्लक्ष झाले, असा गंभीर आरोप अमित शाह यांनी केला.
वायनाड हा राहुल गांधींचा पूर्वीचा लोकसभा मतदारसंघ असल्यामुळे तिथल्या दुर्घटनेवर काँग्रेस सह सर्व पक्षांनी गांभीर्याने चर्चा केली. परंतु केरळ सरकारला आठवडाभर आधी दुर्घटनेची शक्यता असल्याचा इशारा देऊनही केरळची सरकारी यंत्रणा का सचेत झाली नाही??, सरकारने कुठल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी का हलवले नाहीत??, हजारो नागरिकांची सुरक्षित ठिकाणी सोय आठवड्याभरात करता येणे शक्य असताना तशा सोयी का केल्या नाहीत??, असे सवाल तयार झाले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App