
जाणून घ्या या मतदारसंघाचा संपूर्ण राजकीय इतिहास
विशेष प्रतिनिधी
गांधीनगर : केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे दिग्गज नेते अमित शाह यांनी शुक्रवार, १९ एप्रिल रोजी गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेलही उपस्थित होते.Amit Shah has filed his nomination form from Gandhinagar constituency
यावेळी अमित शाह यांनी पहिल्या टप्प्यातील मतदानात उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन केले आणि यावेळी एनडीए 400 चा टप्पा ओलांडणार असल्याचा पुनरुच्चार केला. गांधीनगर मतदारसंघाचा इतिहास खूप रंजक आहे. भारतीय जनता पक्षाने सुरुवातीपासून येथे आपली पकड मजबूत ठेवली आहे.
गांधीनगर लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचे झाले तर हा मतदारसंघ 1967 मध्ये निर्माण झाला होता. 1977 च्या निवडणुका वगळता काँग्रेसने पाचपैकी चार निवडणुका जिंकल्या. त्या काळात ही जागा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जात होती. मात्र 1989 मध्ये या जागेवर भारतीय जनता पक्षाने विजय मिळवला आणि तेव्हापासून भाजपने या जागेवर आपले वर्चस्व कायम ठेवले. भाजपचे नेते शंकरसिंह वाघेला यांनी काँग्रेसच्या उमेदवार कोकिला व्यास यांचा पराभव करून प्रथमच येथून कमळ फुलवले.
वाघेला यांच्या या विजयानंतर गांधीनगर लोकसभा मतदारसंघ गुजरातमधील भाजपच्या विजयाचे आणि सत्तेचे केंद्र बनले. यानंतर भाजपचे भीष्मपितामह म्हणवले जाणारे लालकृष्ण अडवाणी यांनीही या जागेवरून निवडणूक लढवून जोरदार विजय नोंदवला. पाच वर्षांनंतर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीही याच जागेवर निवडणूक लढवली आणि यश मिळवले.
Amit Shah has filed his nomination form from Gandhinagar constituency
महत्वाच्या बातम्या
- आपचे आमदार अमानतुल्ला यांची वक्फ बोर्डप्रकरणी ईडीकडून 9 तास चौकशी, 32 जणांच्या अवैध नियुक्तीचा आरोप
- हैदराबादेत मतदार याद्यांचे कायदेशीर शुद्धीकरण; तब्बल 5,41,201 मतदारांची नावे टाकली वगळून; घ्या अर्थ समजून!!
- मनीष सिसोदियांना धक्का, कोर्टाने पुन्हा न्यायालयीन कोठडी वाढवली
- निवडणूक देशाची, पंतप्रधान निवडण्याची; पण बुडत्या विरोधकांना हौस स्थानिक अस्मितांच्या काड्यांवर तरंगण्याची!!