Amit Shah रायगडावर अमित शाहांच्या हस्ते उदयसिंहराजे होळकर, ले. ज. संजय कुलकर्णी आणि दुर्गा अभ्यासक नीलकंठ पाटलांचा सत्कार, पुस्तकाचेही प्रकाशन!!

विशेष प्रतिनिधी

रायगड : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्यासमवेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुण्यतिथी आणि समाधी स्थळाच्या जीर्णोद्धार शताब्दी कार्यक्रमामध्ये किल्ले रायगड येथे पुरस्कारप्राप्त मान्यवरांना सन्मानित केले.

यामध्ये पराक्रमी होळकर सरदार घराण्याचे वारसदार उदयसिंहराजे होळकर, सैन्य दल अधिकारी परम विशिष्ट सेवा पदक, अतिविशिष्ट सेवा पदक, शौर्यचक्र विजेते लेफ्टनंट जनरल संजय कुलकर्णी आणि श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार – दुर्ग अभ्यासक निळकंठ रामदास पाटील यांचा समावेश होता.

यावेळी सर्व मान्यवरांच्या हस्ते श्री शिवाजी महाराज रायगड स्मारक मंडळ, स्थानिक उत्सव समिती, महाड यांच्यामार्फत प्रकाशित ‘शिवरायमुद्रा स्मरणिका’ आणि डॉ. अशोक बांगर लिखित ‘धर्मयोगिनी अहिल्यादेवी होळकर’ या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले. केले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार, खा. श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, मंत्री भरतशेठ गोगावले, शिवेंद्रराजे भोसले, चंद्रकांतदादा पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते

Amit Shah felicitate Shiva Premis and scholars on Raigad

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात