Sheikh Hasina : ‘…म्हणून अमेरिकेने मला सत्तेवरून हटवले’ ; शेख हसीना यांचा गंभीर आरोप!

Sheikh Hasina

कट्टरपंथीयांकडून स्वत: ची फसवणूक होवू देऊ नका, असं आवाहनही बांगलादेशी नागिरकांना केलं आहे.


विशेष प्रतिनिधी

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना ( Sheikh Hasina ) यांनी अमेरिकेवर मोठा आरोप केला आहे. सध्या भारतात वास्तव्यास असलेल्या शेख हसीना यांचे म्हणणे आहे की, सेंट मार्टिन बेट त्यांनी न दिल्याने अमेरिकेने त्यांना सत्तेवरून बेदखल केले. शेख हसीना म्हणतात की सेंट मार्टिन बेट मिळाल्यानंतर बंगालच्या उपसागरावर अमेरिकेचा प्रभाव वाढला असता.



शेख हसीना यांनी आपल्या संदेशात बांगलादेशी नागरिकांना कट्टरपंथीयांकडून स्वत:ची दिशाभूल होई न देण्याचा इशारा दिला आहे. आपल्या जवळच्या सहाय्यकांनी पाठवलेल्या आणि ईटीला उपलब्ध करून दिलेल्या संदेशात शेख हसीना म्हणाल्या, “मला मृतदेहांची मिरवणूक बघावी लागू नये म्हणून मी राजीनामा दिला. त्यांना(विरोधकांना) विद्यार्थ्यांच्या मृतदेहांवर सत्तेत यायचे होते, पण मी हे होऊ न देता पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.’

हसीना पुढे म्हणाल्या, “मी जर सेंट मार्टिन बेटाचे सार्वभौमत्व सोडले असते आणि अमेरिकेला बंगालच्या उपसागरावर प्रभाव पाडण्याची परवानगी दिली असती तर मी सत्तेत राहू शकले असते. मी माझ्या देशातील जनतेला विनंती करते, कृपया कट्टरपंथीयांकडून स्वत: ची फसवणूक होवू देऊ नका.

America removed me from power Sheikh Hasina

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात