विशेष प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी केंद्रित बातम्यांचा त्रिफळा; आल्या सगळ्या जुन्या भ्रष्टाचाराच्या कळा!! यांनी आज शारदीय नवरात्राची पहिली माळ गाजली. आज राष्ट्रवादीशी संबंधित जेवढ्या बातम्या मराठी माध्यमांमध्ये आल्या, त्या सगळ्या त्या पक्षातल्या नेत्यांच्या जुन्या भ्रष्टाचाराशी संबंधित होत्या. All the NCP corruption news in marathi media today
सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने आज राष्ट्रवादीचे माजी खासदार ईश्वर जैन आणि त्यांचे चिरंजीव मनीष जैन यांच्या राजमल लखीचंद ज्वेलर्सची तब्बल 315 कोटींची मालमत्ता जप्त केली. त्यासाठी ईडीने जळगाव, मुंबई, सिल्लोड, ठाणे आणि गुजरात मधील कच्छमध्ये तब्बल 70 ठिकाणांवर छापे घातले. मनी लॉंड्रिंग व्यवहारातली तब्बल 315 कोटींची मालमत्ता ईडीने जप्त केली. यासंदर्भात माजी खासदार ईश्वर जैन यांनी आधीच राजकीय सूडभावनेची भाषा केलीच होती. त्या भाषेत काही नवीन नव्हते, पण साधारण महिना – दीड महिन्यापूर्वी ईडीने फक्त छापे घातले होते. आज 315 कोटींची संपत्ती जप्त केली. या कारवाईची अधिकृत माहिती ईडीने आपल्या वेगवेगळ्या सोशल मीडिया अकाउंट वर दिली.
त्यानंतर आज अचानक राजकीय टाइमिंग साधत छगन भुजबळ यांच्या संदर्भात शरद पवारांनी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेले पत्र समोर आले. छगन भुजबळ वयाच्या ७१ व्या वर्षी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदन घोटाळ्याच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. न्यायालयात त्यांच्यावर कोणतेही आरोप सिद्ध झालेले नाहीत, पण तरी देखील त्यांना जामीन मिळत नाही. सर्वोच्च न्यायालयाने जामीन हा नियम आहे, पण तुरुंग हा अपवाद आहे, असे सांगूनही छगन भुजबळांना न्याय मिळत नाही अशी न्यायाची मागणी करणारे पत्र लिहिल्याचे नेमके आजच समोर आले.
ज्यावेळी छगन भुजबळ आणि शरद पवार गट यांच्यात वेगवेगळ्या विषयांवर उभा दावा निर्माण झाला आहे, नेमकी तीच वेळ साधून काही विशिष्ट माध्यमांनी शरद पवारांचे छगन भुजबळ विषयी सहानुभूती दाखवणारे पत्र समोर आणले, हे आजच्या टायमिंगचे वैशिष्ट्य होते. पण विषय राष्ट्रवादीच्याच भ्रष्टाचाराचा होता.
शरद पवारांच्या पत्राच्या बरोबरीने आज पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांच्या “मॅडम कमिशनर” या आत्मचरित्रातल्या विशिष्ट प्रकरणाची चर्चा सुरू झाली. 2010 मधल्या पुण्याच्या दादा पालकमंत्र्यांवर मीरा बोरवणकरांनी आपल्या “मॅडम कमिशनर” या पुस्तकात काही लिहिले आहे. येरवड्यातील तब्बल 3 एकर जमीन एका खासगी बिल्डरला देण्यासाठी पुण्यातल्या दादा पालकमंत्र्यांचा दबाव होता आणि त्या दबावा पुढे तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटलांचेही काही चालत नव्हते, असे महत्त्वाचे निरीक्षण मीरा बोरवणकर यांनी “मॅडम कमिशनर” या पुस्तकात नोंदविले आहे. दादा पालक मंत्र्यांनी आर. आर. आबा पाटलांविषयी जे उद्गार काढले ते आपण लिहू पण शकत नाही एवढे खालच्या दर्जाचे होते. दादा पालक मंत्र्यांनी येरवड्यातल्या त्या जमिनीचे नकाशे टेबल वरून खाली फेकले, अशी आठवण देखील मीरा बोरवणकरांनी लिहिल्याचे देखील बातम्यांमध्ये नमूद केले आहे.
त्यावर दादा पालकमंत्र्यांनी आज खुलासाही केला आहे. सरकारी जमिनीचा लिलाव करण्याचा अधिकार कुठल्याच पालकमंत्र्याचा नसतो. तो अधिकार सरकारचा म्हणजे मंत्रिमंडळाचा असतो. मंत्रिमंडळानेच परवानगी दिली असेल तर त्याला काही करता येत नाही, असा खुलासा दादा पालकमंत्र्यांनी केल्याचे बातम्यांमध्ये नमूद आहे, पण विषय राष्ट्रवादीचाच आणि त्यातही जुन्या भ्रष्टाचाराचाच आहे!!
… आणि नेमका हाच तो, राष्ट्रवादीच्या केंद्रित बातम्यांचा त्रिफळा; आल्या जुन्या भ्रष्टाचाराच्या कळा!!, हा विषय आहे. हे सगळे भ्रष्टाचार काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडीच्या सरकारच्या काळात झाले, ते आज “पवारनिष्ठ नॅरेटिव्हचे” राजकीय टायमिंग साधून समोर आले!!
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App