वृत्तसंस्था
नवी दिल्ली : शरद पवारांपासून वेगळे झालेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आज सुप्रीम कोर्टाने कान खेचले. तुम्ही शरद पवारांपासून वेगळे झालाय, तर मुळात त्यांचा फोटो का वापरत आहात?? निवडणुकीत कुठलाही संभ्रम राहू नये म्हणून तुम्ही घड्याळ चिन्हाऐवजी दुसरे चिन्ह निवडा, अशा स्पष्ट शब्दांत सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सूर्यकांत यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे कान खेचले. Ajitdada NCP appeals from the Supreme Court
घड्याळाऐवजी नवे चिन्ह निवडण्याची सूचना थेट सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने केल्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी लोकसभेच्या निवडणुका जाहीर होण्याच्या आदल्याच दिवशी अडचणीत सापडली आहे. सुप्रीम कोर्टाने या सूचनेचे आदेशात रूपांतर केले तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची खरी पंचाईत होणार आहे. कारण निवडणूक आयोगाने अजित पवारांना मूळ राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्याचे चिन्ह घड्याळ हे आधीच बहाल केले आहे. त्यामुळे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस घड्याळ चिन्हावर लढणार अशीच अटकळ बांधली गेली आहे. या पार्श्वभूमीवर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घड्याळाऐवजी दुसरे चिन्ह निवडा हा पर्याय दिल्याने हा पर्याय सुचविल्याने अजितदादांची अडचण झाली आहे.
त्याचबरोबर शरद पवारांचा फोटो वापरण्याचे काहीच कारण नाही. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस जर वेगळी झाली असेल, तर दोन्ही पक्ष स्वतंत्र आहेत. त्यामुळे मते मागण्यासाठी आत्मविश्वासाने स्वतःचाच फोटो वापरावा. इतरांचे फोटो वापरण्याचे कारण नाही, अशा स्पष्ट शब्दांमध्ये न्यायमूर्ती सूर्यकांत आणि के. व्ही. विश्वनाथ यांच्या खंडपीठाने अजित पवारांच्या राष्ट्रवादीची कानउघडणी केली.
राष्ट्रवादीचे नाव आणि चिन्ह या प्रकरणावरची पुढची सुनावणी सुप्रीम कोर्टाने 19 मार्च रोजी ठरवेल रोजी घेण्याचे निश्चित केले असून त्यापूर्वी अजित पवार गटाला स्वतःचे चिन्ह निवडावे लागणार आहे त्याचबरोबर शरद पवारांचा फोटो वापरणार नाही हे सुप्रीम कोर्टाला लेखी द्यावे लागणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App