वृत्तसंस्था
नवी दिल्ली : ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर केंद्र सरकारने बिल संमत केले असले तरी एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी भडकले. त्यांनी भाजपबरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांवर राग काढला आहे.AIMIM MP Asaddudin Owisi took dig at BJP and NCP – Shiv Sena over Maratha reservation
राष्ट्रवादी आणि शिवसेना फक्त मराठा आरक्षणाच्या बाता करतात. मुस्लिम आरक्षण या विषयात ते काही बोलत नाहीत. मराठा समाजाला मागास सिद्ध करण्यासाठी त्यांचा आटापिटा चालू आहे. परंतु_ मुस्लिमांमध्येही मागास जनता आहे. सच्चर आयोगाने हे सत्य समोर आणले आहे. तरीदेखील राष्ट्रवादी आणि शिवसेना ते मान्य करत नाहीत, असा आरोप ओवैसी यांनी काल लोकसभेत केला.
त्याच बरोबर शिवसेना आणि राष्ट्रवादीला यांनी खडे बोल सुनावले. इतरांना आरक्षण आणि मुसलमानांना काय तर “इफ्तार पार्टीची दावत आणि तोंडात खजूर”, अशा शेलक्या शब्दांमध्ये ओवैसी यांनी राष्ट्रवादीच्या आणि शिवसेना नेत्यांचा समाचार घेतला.
हिंदू सोडून अन्य धर्मीय मागासवर्ग गृहीत धरून त्यांना आरक्षण देण्यात येते. मुस्लिमांच्या मधील मागास वर्गाला आरक्षण का देण्यात येत नाही?, असा सवाल त्यांनी केंद्रातल्या भाजप सरकारला केला. आम्ही किती दिवस तुमच्या पुढे हात पसरायचे?, आम्ही काय भिकारी आहोत का?, असे संतप्त उद्गार त्यांनी लोकसभेत काढले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App