विशेष प्रतिनिधी
बंगळुरू : असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील अखिल भारतीय मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) म्हणजे कर्नाटकातील तालीबानी आहेत असा आरोप भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणिस सी. टी. रवी यांनी केला आहे.AIMIM is the Taliban in Karnataka, BJP’s national general secretary C. T. Ravi’s allegation
कलबुर्गी येथील आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रवी बोलत होते. या निवडणुकांत एआयएमआयएमची कामगिरी की असेल विचारले असताना ते म्हणाले तालीबान्यांमध्ये आणि त्यांच्यात काहीही फरक नाही. ते कर्नाटकातील तालीबानीच आहेत. त्यामुळे कलबुर्गीतील नागरिक त्यांना स्वीकारणार नाहीत.
कलबुर्गी महापालिकेच्या रखडलेल्या निवडणुका ३ सप्टेंबर रोजी होणार आहेत. याबरोबरच हुबळी-धारवाड आणि बेळगावच्याही निवडणुका होत आहेत. कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासाठी या निवडणुका प्रतिष्ठेच्या आहेत.
कारण मुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर ते प्रथमच कोणत्या निवडणुकीला सामोरे जात आहेत. या तीनही महापालिकांत भारतीय जनता पक्ष आणि कॉँग्रेस यांच्यात थेट सामना आहे. जनता दलाचा (सेक्युलर) येथे प्रभाव नाही.
भाजपचे दुसरे राष्ट्रीय सरचिटणीस पी मुरलीधर राव यांनीही एआयएमआयएमवर हल्लाबोल केला होता. या पक्षाने तालीबानला उघडपणे समर्थन दिले असल्याचा आरोप त्यांनी केला होता. यावर ओवेसी म्हणाले की, तालिबानने अफगाणिस्तान ताब्यात घेतल्याने पाकिस्तानला सर्वात जास्त फायदा होईल. याचे कारण म्हणजे पाकिस्तानची गुप्तचर संस्था इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजन्सचे तालीबानी दहशतवाद्यांवर नियंत्रण आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App