कर्नाटकातील सर्व शाळांना कन्नड विषयाची सक्ती कायम सरकारचे स्पष्टीकरण


विशेष प्रतिनिधी

बंगळूर : कर्नाटक राज्यातील सर्व शाळांनी कन्नड विषय एक भाषा म्हणून शिकवलेच पाहिजे, यात कोणत्याही प्रकारची तडजोड करण्यात येणार नाही, असा इशारा कर्नाटकचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मंत्री एस. सुरेश कुमार यांनी दिला. kanada language is compulsory in karnataka

ते म्हणाले, राज्यातील सरकारी अनुदानित व खासगी शाळांप्रमाणेच सीबीएसई, आयसीआयसीसह सर्व प्रकारचे अभ्यासक्रम शिकवणाऱ्या शाळांना कन्नड भाषा एक विषय म्हणून शिकवणे सरकारने सक्तीचे केले आहे. कन्नड अध्ययन अधिनियम २०१५ कायद्यानुसार राज्यातील सर्व शाळांना कन्नड विषय शिकविणे बंधनकारक आहे.परराज्यातील कन्नड भाषिक विद्यार्थ्यांना व्यवसाय अथवा अन्य विषयाच्या अभ्यासक्रमात प्रवेश घेण्यासाठी कन्नडचा पेपर सक्तीचा करण्यात आल्याने गेल्या एक महिन्यापासून सोशल मीडियावर कन्नडविरोधी मोहीम सुरू केली आहे.

यावर प्रतिक्रिया देताना त्यांनी कन्नड भाषा अध्ययन सर्वांना सक्तीचे असल्याचे स्पष्ट केले. यासंबंधी कन्नड विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षांनी आपली भेट घेऊन कन्नड विषय सक्तीचा करण्याची विनंती केली असल्याचे त्यांनी सांगितले.

kanada language is compulsory in karnataka

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण