वृत्तसंस्था
नवी दिल्ली – पंजाबच्या सत्ताधारी काँग्रेसमधील गटबाजी संपुष्टात आणण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी नेमलेल्या तीन सदस्यांच्या समितीने सोनिया गांधींना आज रिपोर्ट सोपविला. त्यामध्ये नवज्योत सिंग सिध्दूला काँग्रेसमध्ये योग्य स्थान देण्याची महत्त्वाची शिफारस करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातही काँग्रेसमध्ये एक समन्वय समिती स्थापन करून पक्षातली विविध रिकामी पदे भरण्याची शिफारस करण्यात आली आहे. AICC panel submits report recomends navajyot singh siddhu be made DyCM or PPCC president
पंजाबमध्ये २० ते २५ काँग्रेस आमदार मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांच्या विरोधात आहेत. त्यांनी हायकमांडकडे विविध तक्रारी करून अमरिंदर सिंग यांना हटविण्याची मागणी केली होती. त्यामुळेच सोनिया गांधींनी बंडखोर आमदारांच्या तक्रारी ऐकून घेऊन रिपोर्ट सादर करण्यास समितीला सांगितले होते. त्यानुसार हा रिपोर्ट सादर झाला आहे.
यात सिध्दूला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद देण्याची शिफारस करण्यात आली आहे. जर अमरिंदर सिंग हे प्रदेशाध्यक्षपद सिध्दूला द्यायला राजी नसतील, तर त्याला उपमुख्यमंत्रीपद द्यावे अशी शिफारस समितीने केली आहे.
समितीकडे जशा बंडखोर आमदारांनी तक्रारी केल्या तशाच अमरिंदर सिंग यांच्या बाजूनेही अनेक आमदार बोलले आहेत. त्यामुळे नेतृत्व बदलाचा प्रश्न बाजूला पडला आहे. हे पाहूनच बंडखोर आमदारांनी आपला पवित्रा कायम ठेवला आहे. अमरिंदर सिंग यांनी समितीला सादर केलेल्या रिपोर्टमध्ये काही नेते भ्रष्ट असल्याचे म्हटले आहे. याचा अर्थ त्यांनी आपण स्वतःच भ्रष्ट सरकार चालवत असल्याची कबुली दिली आहे, अशी टीका काँग्रेस आमदार परगट सिंग यांनी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App