अमेरिकेनंतर आता कॅनडाच्या अवकाशात उडताना दिसली संशयास्पद वस्तू, पीएम ट्रुडोंच्या आदेशानंतर अमेरिकेने केली नष्ट

वृत्तसंस्था

टोरंटो : अमेरिकेनंतर कॅनडातही हवाई धोका दिसून आला. अमेरिकेच्या फायटर जेटने कॅनडाच्या हवाई क्षेत्रात घुसून उडणारी वस्तू खाली पाडली आहे. कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी याबाबत खुलासा केला आहे. जस्टिन ट्रूडो यांनी शनिवारी (11 फेब्रुवारी) सांगितले की, त्यांच्या आदेशानुसार कॅनेडियन हवाई क्षेत्रात एक अज्ञात उडणारी वस्तू खाली पाडण्यात आली. After the US, a suspicious object was seen flying in Canada’s space, the US destroyed it after the order of PM Trudeau

या कारवाईच्या एक आठवडा आधी म्हणजे 4 फेब्रुवारीला अमेरिकेने फायटर जेटद्वारे क्षेपणास्त्रासह चिनी स्पाय बलून नष्ट केला होता.

कॅनडाने उद्ध्वस्त केली उडणारी संशयास्पद वस्तू

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रूडो यांनी ट्विट केले, “मी कॅनडाच्या हवाई क्षेत्राचे उल्लंघन करणाऱ्या एका अज्ञात वस्तूला खाली पाडण्याचे आदेश दिले. जस्टिन ट्रूडो म्हणाले की, त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्याशी याबाबत बोललो. उत्तर अमेरिकन एअरोस्पेस डिफेन्स कमांडने युकॉनवर उडणारी वस्तू खाली पाडली. कॅनेडियन आणि अमेरिकन विमाने खाली उतरली. स्क्रॅम्बल केले आणि यूएस एफ-22 ने ऑब्जेक्टला यशस्वीरित्या टार्गेट केले.”

अमेरिकेने नुकताच पाडला होता चिनी बलून

उत्तर-पश्चिम कॅनडात अज्ञात उडणारी वस्तू खाली पाडण्याच्या एक दिवस आधी, यूएस अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांनी अलास्काच्या 40,000 फूट उंचीवर उडणारी वस्तू खाली पाडली. 4 फेब्रुवारी रोजी अमेरिकन सैन्याने कथित चिनी स्पाय बलूनला लक्ष्य केल्यानंतर एका आठवड्याने ही कारवाई झाली, ज्यामुळे बीजिंगशी नवीन राजनैतिक मतभेद निर्माण झाले आहेत.

अमेरिकेच्या आण्विक साइटवर एक चिनी स्पाय बलून दिसला होता, जो 4 फेब्रुवारी रोजी बायडेन प्रशासनाने खाली पाडला होता. अमेरिकेने चीनवर बलूनच्या माध्यमातून गुप्तचर माहिती गोळा केल्याचा आरोप केला, तर चीनने याला सिव्हिल बलून म्हटले आणि ते केवळ हवामान संशोधनासाठी असल्याचे सांगितले.

After the US, a suspicious object was seen flying in Canada’s space, the US destroyed it after the order of PM Trudeau

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात