एक्झिट पोलच्या निकालानंतर गिरीराज सिंह यांचा विरोधकांवर जोरदार प्रहार

अरविंद केजरीवलांवर साधला निशाणा, जाणून घ्या काय म्हटले?


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या सातव्या टप्प्यातील मतदानानंतर एक्झिट पोलचे निकाल आले आहेत. एक्झिट पोलनुसार एनडीए पुन्हा एकदा सरकार स्थापन करू शकते. एक्झिट पोलमध्ये एनडीए आघाडीला 300 पेक्षा जास्त जागा मिळताना दिसत आहेत.After the results of the exit poll Giriraj Singh attacked his opponents

विरोधकांनी एक्झिट पोलचे निकाल पूर्णपणे फेटाळून लावत भाजपवर हल्लाबोल केला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केला आहे.



विरोधकांवर निशाणा साधत ते म्हणाले, ‘देशात पहिल्यांदाच साधू स्वभावाची व्यक्ती पंतप्रधान झाली आहे. आज नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेने विश्वास व्यक्त केलेला आहे. एक नरेंद्र मोदी सर्वांवर भार ठरले आहेत. या लोकांनी(विरोधकांनी) लोकशाही आणि निवडणुकांना चेष्टेचा विषय बनवलं होतं. कालपासून टीव्हीवर खटाखट दिसत आहे ना फटाफट दाखवलं जात आहे. हे दोघे कुठे आहेत माहीत नाही. राहुल गांधी कुठेतरी परदेशात जातील आणि तेजस्वी यादव लालूजींसोबत मशिदीत बसतील.

विरोधकांवर निशाणा साधत ते पुढे म्हणाले, ‘विरोधकांनी जनतेचा मूड समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. देशातील जनतेने आज पंतप्रधान मोदींवर व्यक्त केलेला विश्वास हेच दाखवते की, देशात आता विरोधकांची विश्वासार्हता उरलेली नाही.

अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करावे लागले आहे. अशा स्थितीत अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्लाबोल करताना ते म्हणाले, ‘कुठेतरी कसायाच्या शापाने गाय मेली आहे का?, असं वाटत होतं जसं की हे लोक फार मोठे ज्योतिषी आहेत. मात्र तेच आज तुरुंगात जाणार आहे. त्यांनी स्वतःला भगतसिंग मानले आहे. भ्रष्टाचाराच्या प्रकरणात तुरुंगात गेलेल्या अशा लोकांना अजिबात पाठिंबा नसावा. ,

After the results of the exit poll Giriraj Singh attacked his opponents

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात