सुषमा अंधारेंनी व्हिडीओ ट्वीट करून गृहमंत्रालयावर प्रश्न उपस्थित केल्यावर, फडणवीसांकडूनही प्रत्युत्तर, म्हणाले…

  • जाणून घ्या नेमकं कशाप्रकारे प्रत्युत्तर दिलं आहे फडणवीसांनी?

विशेष प्रतिनिधी

पुणे : पोलिसांचा एक व्हिडीओ ट्वीट करून त्यावरून गृहमंत्रालयावर टिप्पण करत, उमुख्यमंत्री फडणवीसांना लक्ष्य करणाऱ्या, ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांना फडणवीसांनी प्रत्युत्तर दिले आहे.After Sushma Andhare raised questions on the Home Ministry by tweeting a video Fadnavis also responded

पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ”ललित पाटील केसच्या संदर्भातील गोष्टी मी स्पष्टपणे सांगितल्या आहेत आणि कोणी संरक्षण दिलं हे देखील स्पष्ट झालेलं आहे. त्यामुळे त्यासंदर्भात आता खरं म्हणजे त्यांना बोलायलाच जागा नाही. पण त्यांनीच काय कोणीही एखादी तक्रार केली असेल, एखादा व्हिडीओ ट्वीट केला असेल. तर सत्यता पडताळून पाहिली जाईल आणि कारवाई केली जाईल.”



याशिवाय ” ललित पाटील प्रकरणात अनेकांची तोंडं तर बंद झालीच आहेत, उरलेलीही लवकरच होतील. थोडी अजून वाट पाहा, शेवटी या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याची खोलवर पायंमूळं आहेत. त्यामुळे वरवरची कारवाई करून यामध्ये फायदा होणार नाही. मूळ याचे कोण सूत्रधार आहेत, जे अशाप्रकारचं रॅकेट चालवतात. ते देखील शोधून काढण्याची आवश्यकता आहे, त्याचे आदेश मी दिलेले आहेत आणि मला विश्वास आहे ते सापडतील.” असा सूचक इशाराही फडणवीसांनी यावेळी दिला.

सुषमा अंधारे काय म्हणाल्या होत्या?

”उठा उठा देवेंद्रजी पोलिसांची गाडी थांबली.. पुन्हा एकदा गृहखात्याची अब्रू चव्हाट्यावर आली..कसली सुरक्षा, कसला बंदोबस्त? आधी पोलिसांशी हितगुज की देवघेव? मग हळूच निर्जन स्थळी कैद्यांची गाडी थांबवून ही कसली पाकीट पुरवली जात आहेत? स्थळ: पुणे जेल रोड.” असं म्हणत सुषमा अंधारेंनी ट्वीटसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

After Sushma Andhare raised questions on the Home Ministry by tweeting a video Fadnavis also responded

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात