विशेष प्रतिनिधी
मुंबई: वांद्रे वरळी सी-लिंकवरील टोल प्लाझाजवळ एका वेगवान एसयूव्ही कारने अनेक वाहनांना धडक दिली. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत.A speeding SUV hit several cars at the Bandra Worli C Link Toll Plaza in Mumbai The death of three
पोलिसांनी सांगितले की, गुरुवारी रात्री 10.15 च्या सुमारास, टोलनाक्याच्या अगदी 100 मीटर आधी, वांद्र्याच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या टोयोटा इनोव्हा कारने मर्सिडीजला धडक दिली.
यानंतर घटनास्थळावरून पळून जाण्याच्या प्रयत्नात कारने टोलच्या रांगेतील इतर अनेक वाहनांना धडक दिली. त्यामुळे टोल नाक्यावर उभ्या असलेल्या सहा वाहनांची समोरासमोर धडक होऊन त्यात बसलेले लोक जखमी झाले. तत्काळ सर्व जखमींना बाहेर काढून जवळच्या भाभा रुग्णालयात पाठवण्यात आले.
वरिष्ठ पोलिस अधिकारी कृष्णकांत उपाध्याय म्हणाले, ” धडकल्यानंतर एसयूव्ही कारचा वेग आणखी वाढला आणि ती टोल प्लाझावर दोन-तीन अन्य वाहनांनाही धडकली. या अपघातात एकूण सहा वाहनांचे नुकसान झाले. यात नऊ जण जखमी झाले., त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे. इतर सहा जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर आहे.”
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App