आम आदमी पार्टी आणि विरोधकांच्या इंडिया आघाडीतील युती आता जवळपास संपुष्टात आल्याचे दिसत आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : I.N.D.I.A आघाडीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंजाबपाठोपाठ आता दिल्लीतील सातही जागांवर एकट्याने निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी पंजाबमध्येही आम आदमी पार्टीने स्वबळाचा नारा दिलेला आहे.After Punjab Aam Aadmi Party will contest all seats in Delhi as well
याशिवाय पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनीही विरोधी आघाडीपासून फारकत घेत आगामी लोकसभा निवडणुकीत ‘एकला चालो’चा फॉर्म्युला स्वीकारला होता.
आम आदमी पक्षाला लोकसभेच्या सातही जागा जिंकायच्या आहेत, हे दिल्लीने ठरवले आहे, असे केजरीवाल म्हणाले आहेत. तसेच पंजाबमध्ये लोकसभेच्या 13 पैकी 13 जागा जिंकून आम आदमी पक्षाला विजयी करा. असे आवाहनही केजरीवालांनी केलेले आहे.
केजरीवालांच्या या घोषणेमुळे विरोधी आघाडी भारताला मोठा धक्का बसला आहे, ज्यामुळे INDIA Alliance आणि आम आदमी पार्टी यांच्यातील आघाडी आता पूर्णपणे संपुष्टात आल्यात जमा आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App