नाशिक : हरियाणातील चौधरी भजनलाल यांच्या अस्तानंतर तब्बल 20 वर्षांनी राजस्थानातल्या शर्मा भजनलाल यांचा राजकीय उदय झाला आहे. भजनलाल हे नाव तसे दुर्मिळ आहे आणि त्यातही राजकारणात ते आणखी दुर्मिळ आहे. After 20 years of harayana’s Bhajanlal sunset new Bhajanlal emergence in rajasthan
हरियाणाच्या 3 लालांपैकी चौधरी भजनलाल बिश्नोई हे 3 वेळा मुख्यमंत्री राहिले. हरियाणाचे राजकारण तब्बल 30 वर्षे 3 लालांभोवतीच फिरत राहिले होते, चौधरी देवीलाल, चौधरी बन्सीलाल आणि चौधरी भजनलाल हे ते 3 जाट नेते होत. हे तिघेही हरियाणाचे राजकारण एकमेकांभोवतीच फिरवत राहिले होते. तेच एकमेकांना हरवत आणि जिंकत होते. जिंकून मुख्यमंत्री बनत होते. 1960 ते 1990 या 3 दशकांमध्ये देवीलाल, बन्सीलाल आणि भजनलाल हेच आलटून पालटून हरियाणाचे मुख्यमंत्री राहिले.
3 लालांमध्ये भजनलाल यांना काँग्रेसने जास्त संधी दिली. त्यामुळे भजनलाल हे नाव देशाच्या राजकारणात गाजत राहिले. इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि पी. व्ही. नरसिंह राव या 3 काँग्रेस अध्यक्षांचा आणि पंतप्रधानांचा विश्वास कमवून भजनलाल यांनी हरियाणाच्या राजकारणावर आपली मांड पक्की ठेवली होती.
2011 मध्ये भजनलाल यांचे निधन झाले त्यानंतर भजनलाल हे नाव भारताच्या राजकीय पटलावरून अस्तंगत झाले. ते दुर्मिळ भजनलाल हे नाव आजच राजस्थानच्या राजकारणात वेगळ्या आशयाने नव्याने उदयाला आले आहे.
हरियाणातले चौधरी भजनलाल बिश्नोई हे जाट होते. काँग्रेसचे नेते होते. पण राजस्थानातले भजनलाल शर्मा भाजपचे नेते आणि ब्राह्मण आहेत. हिरालाल शास्त्री, जय नारायण व्यास, शिवचरण माथुर आणि हरिदेव जोशी यांच्यानंतर ते राजस्थानचे पाचवे ब्राह्मण मुख्यमंत्री बनले आहेत. भजनलाल शर्मा सोडले तर बाकी सर्व नेते काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते. यापैकी हरिदेव जोशी यांनी इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरसिंह राव या काँग्रेस अध्यक्ष आणि पंतप्रधानांचा विश्वास कायम राखून दीर्घकाळ राजस्थानचे मुख्यमंत्री पद भूषविले होते.
राजस्थान भाजपचे सरचिटणीस राहिलेले भजनलाल शर्मा हे 2023 च्या विधानसभा निवडणुकीत सांगानेर या अत्यंत सुरक्षित आणि भाजपच्या बालेकिल्ल्यातून विधानसभेवर निवडून आले आहेत. ते सध्या जयपूर निवासी असले तरी ते मूळचे भरतपूर जिल्ह्यातले आहेत. त्यांच्याबरोबरच मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये माध्यमांनी आणलेले नाव दिया कुमारी यांना भाजपने उपमुख्यमंत्री आणि प्रेमचंद बैरवा यांना देखील उपमुख्यमंत्री केले आहे. वासुदेव देवनानी यांना विधानसभेचे अध्यक्षपद दिले आहे.
नव्या टीमच्या खांद्यांवर 2024 ची जबाबदारी
छत्तीसगड आणि मध्य प्रदेश प्रमाणेच राजस्थानात देखील दोन उपमुख्यमंत्री करून पूर्णपणे नवीन टीम राज्याच्या सेवेत भाजपने उतरवली आहे. या नव्या टीम्सच्या खांद्यांवर आता लोकसभा निवडणूक 2024 ची मदर आली आहे. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तिन्ही राज्यांमध्ये भाजपचा 2014 आणि 2019 या दोन्ही निवडणुकांमध्ये सर्वोत्तम परफॉर्मन्स राहिला आहे. हा परफॉर्मन्स जसाच्या तसा टिकवण्याची जबाबदारी या नव्या टीम्सवर आली आहे. या टीम्स ही जबाबदारी कशी पार पाडतात??, यावर मोदींनी केलेल्या राजकीय प्रयोगाचे यश अवलंबून आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App