वृत्तसंस्था
कोलकता : कोलकत्यातील दुर्गा पूजा समितीने मूळच्या अफगाणिस्तानातील पख्तूनमधील दोघा रहिवाशांचे थीम साँग सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या काही दिवसांत अफगाणिस्तानात तालिबानचा कब्जा व संबंधित बातम्यांनी अवघ्या जगाची चिंता वाढविली आहे. या पार्श्वभूमीवर, पश्चिम बंगालमध्ये पुढील महिन्यातील नवरात्रात पख्तुनी रहिवाशांचे सामाजिक सौहार्दाचे ‘सूर’ ऐकायला मिळतील. Afghani tunes to be heard in Bengali Durga Puja this year, singing of two Pakhtuns on Navratri in Kolkata
कोलकत्यातील बागुईती, केस्तोपूर, लेक टाऊन आणि डमडम पार्क परिसरातील नवरात्रीची पूजा लोकप्रिय आहे. येथील पूजेचे यंदा ४० वे वर्ष असून यावेळी अफगाणिस्तानातील या पख्तुनी नागरिकांच्या आवाजात पुश्तू भाषेत अफगाणिस्तानची पारंपरिक लोकगीते बंगाली भाविकांना ऐकायला मिळतील. एकीकडे तालिबान अफगाणिस्तानचा ताबा मिळवीत असताना कोलकत्यातील अश्वनीनगर बंधू महाल क्लब या दोन पख्तुनींच्या संपकात होता. अफगाणिस्तानपासून हजारो किलोमीटरवर कोलकत्यातच राहणारे हे पख्तुनी सावकार आहेत. आपल्या रिकाम्या वेळेत त्यांनी गायनाचा छंद जोपासला आहे.
या कार्यक्रमादरम्यान गीतांचे बंगालीमध्ये भाषांतर करण्याचेही पूजा समितीचे नियोजन आहे. अफगाणिस्तानातील डोंगराळ प्रदेशातील त्यांची लोकगीते सादर करण्यासाठी पख्तुनींना तयार केले आहे. नवरात्रीमध्ये मंडपात त्यांचे गायन भाविकांच्या हृदयाला स्पर्श करेल व युद्धग्रस्त अफगाणिस्तानशी एकरूपतेची जाणीव निर्माण करेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App