जगभरातील ४० शिक्षकांना मानाची समजली जाणारी ‘फुलब्राईट’ शिष्यवृत्ती अमेरिकेन सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे.Admirable! Global Teacher Disley Guruji to receive Fulbright Scholarship from USA
विशेष प्रतिनिधी
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर करण्यात आली आहे.
जगभरातील ४० शिक्षकांना मानाची समजली जाणारी ‘फुलब्राईट’ शिष्यवृत्ती अमेरिकेन सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. दरवर्षी ही शिष्यवृत्ती अमेरिकन सरकारडून दिली जात असून यंदाचे हे ७५ वे वर्ष आहे.
पीस इन एज्युकेशन या विषयामध्ये अमेरिकेत संशोधन करण्यासाठी रणजितसिंह डिसले यांना ही शिष्यवृत्ती जाहीर करण्यात आली आहे. फुलब्राईट शिष्यवृत्तीच्या माध्यमातून जगभरातील प्रतिभावंत शिक्षकांना एकत्रित आणून शैक्षणिक संशोधन करण्याची संधी दिली जाते.
नाविन्यपुर्ण उपक्रम करत डिसले गुरूजी जगभरातील ५० इनोव्हेटीव्ह शिक्षकांच्या यादीत विराजमान झाले. मायक्रोसॉफ्ट, गुगल, ब्रिटीश कौन्सिल, प्लीपग्रीड, प्लिकेर्स यांसारख्या आंतराष्ट्रीय संस्थांमध्ये कार्यरत आहेत. आता जगातील सर्वोत्तम विद्यापीठात संशोधन करण्याची संधी डिसले गुरूजींना मिळणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App