विशेष प्रतिनिधी
चेन्नई : ‘जय भीम’ हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झालेला आहे. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. त्याचप्रमाणे समाजातील एका महत्त्वाच्या मुद्दय़ाला पुन्हा लोकांसमोर मांडले आहे. या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारणारा अभिनेता सूर्या याने नुकताच या चित्रपटामधील खऱ्या आयुष्यातील पार्वतीला 10 लाखांची मदत देऊ केली आहे.
Actor Surya donates Rs 10 lakh to Parvati
14 नोव्हेंबर रोजी त्याने ही घोषणा केली की पार्वती अंमल यांच्या नावे 10 लाख रुपयांचा फिक्स डिपॉझिट करणार आहे. जय भीम या चित्रपटातील कथा पार्वती यांच्या खऱ्या आयुष्यावर लिहिली गेली होती.
जय भीम : आयएमडीबीच्या टॉप २५० चित्रपटांच्या यादीमध्ये ‘जय भीम’ सिनेमाचा पहिल्या क्रमांकावर
आदिवासी जमातीतील पार्वती अंमल यांच्या पतीला पोलिसांनी खोटय़ा आरोपावरून अटक केली होती. आणि त्यांना इतका छळ झाला होता की त्यांचा पोलीस कस्टडीमध्ये मृत्यू झाला होता. त्यानंतर पार्वती यांनी आपल्या मृत पतीला न्याय मिळवून देण्यासाठी न्यायालयात दाद मागितली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App