राहुल गांधींच्या निर्णयाला कृष्णम यांनी आत्मघातकी म्हटले, आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : काँग्रेसचे बहिष्कृत नेते आचार्य प्रमोद कृष्णम यांनी पुन्हा एकदा राहुल गांधींवर निशाणा साधला आहे. रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधींच्या निर्णयावर त्यांनी स्मृती इराणींना घाबरल्याचे म्हटले. तसेच सर्वसामान्य काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे. असंही त्यांनी सांगितले. Acharya Pramod Krishnam criticizes Rahul Gandhi
कृष्णम म्हणाले, जे राहुल गांधी घाबरू नका म्हणायचे, तेच राहुल गांधी आज घाबरले आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटायचे की राहुल गांधी घाबरत नाहीत, पण आता असा संदेश गेला आहे की राहुल गांधी परभवाला घाबरले आणि त्यांनी अमेठी सोडले.
राहुल गांधींना “बक्षीस” रायबरेली, कारण काँग्रेसजनांनाच प्रियांका जिंकण्याची “भीती”!!
आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले, “राहुल गांधी अमेठीतून निवडणूक लढवतील, असा जनमानसात काँग्रेस कार्यकर्त्यांचा समज होता आणि हे पहिल्यांदाच घडले आङे की गांधी परिवार अमेठी, रायबरेलीमध्ये पराभूत झाला परंतु जागा नाही सोडली. संजय गांधीही सुद्धा निवडणूक हारली, पण जागा नाही सोडली. इंदिरा गांधीही निवडणूक हारल्या परंतु जागा नाही सोडली, हे पहिल्यांदाच झालं आहे की राहुल गांधींनी जागा सोडली आणि त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चुकीचा संदेश गेला आहे.
रायबरेलीतून निवडणूक लढवण्याच्या राहुल गांधी यांच्या निर्णयावर आचार्य प्रमोद म्हणाले, “जेव्हा लोकांची धारणा बदलते, तेव्हा सर्व काही बदलते. राहुल गांधी यांचा हा निर्णय आत्मघातकी ठरेल, असे मला वाटते, कारण राहुल गांधी जेव्हा काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करायचे तेव्हा घाबरू नका म्हणायचे, जाहीर सभांना संबोधित करताना घाबरू नका, असे ते म्हणायचे. प्रसारमाध्यमांना घाबरू नका, असे सांगणारी व्यक्ती आज स्वत: घाबरली आहे. आता राहुल गांधी एवढे मोठे नेते आहेत, पण स्मृती इराणींना घाबरले कसे, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App