विशेष प्रतिनिधी
श्रीनगर – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू-काश्मीरच्या मुख्य प्रवाहातील नेत्यांशी संवाद साधण्यासाठी घेतलेल्या बैठकीला महिना उलटून गेला असला तरी प्रत्यक्षात कोणताही पाठपुरावा झालेला नाही, असा दावा नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी केला आहे.Abdulla targets PM Modi
मोदी यांनी दिल्लीत २४ जून रोजी ही बैठक घेतली होती. अब्दुल्ला म्हणाले, काश्मिरींची मने जिंकण्यासाठी कोणताही प्रयत्न झालेला नाही. लोकांना तुरूंगात डांबले जात आहे. मतभेद सहन केले जात नाहीत. आम्हाला प्रत्यक्ष परिस्थितीत बदल घडलेला पाहायचा आहे.
काश्मिरींचे भवितव्य बदलणारे ‘केसर’; मोदी सरकार बनवणार केसरला जागतिक ब्रँड
येथील जनतेला त्यांचा राज्याचा दर्जा काढून घेतला गेल्यामुळे, विशेष दर्जा अचानक हटविला गेल्यामुळे यातना झाल्या आहेत. ही दुखावलेली मने जिंकण्यासाठी प्रयत्न होताना दिसले पाहिजेत.
गुपकार युती आणि कट्टर प्रतिस्पर्धी पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (पीडीपी) यांचे भवितव्य काय आहे, याबद्दल ते म्हणाले की, गुपकार युती कायम आहे. आम्ही एक आहोत. आम्ही लढा सोडलेला नाही. आम्ही सारे समविचारी आहोत.
या सरकारच्या नेतृत्वाखालील काश्मीरला राज्याचा दर्जा पुर्ववत दिला जाणार नाही याची कल्पना असली तरी आम्ही त्यासाठी एकत्र आलो आहोत. आम्ही लोकशाही आणि कायदेशीर मार्गाने लढा देत राहू. आमच्यानंतर येणारे लोकही उभे ठाकतील आणि झटतील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App