विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : दिल्लीत आम आदमी पार्टीने आपला जनता अजेंडा ठेवला टांगून केजरीवालांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा, आतिशींनी (Atishi टाकले सांगून!!
दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी पहिल्याच पत्रकार परिषदेत आम आदमी पार्टीचा मूळ जनता अजेंडा बाजूला ठेवला. अरविंद केजरीवाल आपल्या जनता अजेंड्याचा प्रचार प्रसार करून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर दोनदा बसले होते. आपल्याला जनतेचा किती चळवळ आहे यासाठी त्यांनी कुठल्याही राजकीय पक्षांपेक्षा वेगळा अजेंडा बनवला होता. त्यालाच त्यांनी जनता अजेंडा असे नाव दिले होते.
#WATCH | Delhi CM Atishi says, "…We all have to do just one work now- to make Arvind Kejriwal the chief minister of Delhi again…" pic.twitter.com/qpbXG56ZAn — ANI (@ANI) September 21, 2024
#WATCH | Delhi CM Atishi says, "…We all have to do just one work now- to make Arvind Kejriwal the chief minister of Delhi again…" pic.twitter.com/qpbXG56ZAn
— ANI (@ANI) September 21, 2024
परंतु अतिशी यांनी आज शपथ घेतल्यानंतर दिल्लीतल्या जनतेला एकच काम सांगितले, ते म्हणजे फेब्रुवारीतल्या निवडणुकांमध्ये अरविंद केजरीवालांना पुन्हा मुख्यमंत्री बनवा!! यापेक्षा त्यांनी दुसरा कुठलाही नवा किंवा अभिनव अजेंडा दिल्लीतल्या जनतेसमोर ठेवला नाही. उलट त्यांनी अरविंद केजरीवालांना पुन्हा मुख्यमंत्री बनवले नाही, तर दिल्लीतली फ्री बिजली बंद होईल, सरकारी शाळा बदहाल होतील, मोहल्ला क्लिनिक बंद होतील, फ्री इलाज बंद होईल, भाजपचे षडयंत्र यशस्वी होईल, अशी धमकी भरली भाषा वापरली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App