वृत्तसंस्था
नवी दिल्ली : आम आदमी पार्टी सोडून देण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाच्या फार मोठ्या नेत्याचा मला फोन आला होता, असा दावा आम आदमी पार्टीचे पंजाब मधले खासदार भगवंत मान यांनी केला आहे. हा राष्ट्रीय पक्ष नेमका कोणता?,AAP MP Bagwant Mann claimed, big leader. offered cabinet breath in Modi government to leave AAP
याचा खुलासा जरी त्यांनी केला नसला तरी मोदी मंत्रिमंडळात मान यांना हवे ते मंत्रिपद देण्याची ऑफर असल्याचा दावाही भगवंत मान यांनी केला आहे. पंजाब मधल्या एका बड्या खासदाराने असा दावा केल्याने राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.
पंजाब मध्ये फेब्रुवारी-मार्च 2022 मध्ये विधानसभा निवडणुका आहेत. तेथे आम आदमी पार्टीने जबरदस्त जोर लावला आहे. विविध सर्वेक्षणांमधून आम आदमी पार्टीला पंजाबने चांगले यश मिळणार असल्याचे दाखविण्यात आले आहे.
त्याचबरोबर अकाली दल – बहुजन समाज पक्ष युती तसेच काँग्रेसमधून बाहेर पडून पंजाब लोक काँग्रेस स्थापन करणारे नेते कॅप्टन महेंद्र सिंग यांची भाजप बरोबर चालू असलेली राजकीय बोलणी यामुळे पंजाबची विधानसभा निवडणूक चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.
या पार्श्वभूमीवर भगवंत मान यांच्यासारख्या आम आदमी पार्टीच्या वरिष्ठ खासदाराने राष्ट्रीय पक्षावर ऑफर दिल्याचा आरोप करून खडबडून खळबळ उडवून दिली आहे. ही ऑफर नेमकी कोणी दिली? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वतीने केंद्रीय मंत्रिमंडळात मान त्यांना हवे ते मंत्रिपद मिळेल असे नेमके कोणी सांगितले?, याबद्दल त्यांनी आपल्या खुलासा केलेला नाही.
शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकूण राजकीय नावलौकिक लक्षात घेता कोणत्याही कॅबिनेट मंत्र्यांना किंवा नेत्याला त्याला हवे ते खाते मिळेल याची नेमकी कोण खात्री देऊ शकेल?, याची देखील राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App