२३ दिवसांच्या अधिवेशनात एकूण १७ बैठका होणार
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : संसदेचे पावसाळी अधिवेशन २० जुलैपासून सुरू होणार असून ११ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी शनिवारी ही माहिती दिली. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संसदेचे पावसाळी अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. Monsoon session A total of 17 meetings will be held in the 23 day session
प्रल्हाद जोशी यांनी ट्विट केले की, “संसदेचे पावसाळी अधिवेशन, 20 जुलैपासून सुरू होईल आणि ११ ऑगस्टपर्यंत चालेल. या २३ दिवसांच्या अधिवेशनात एकूण १७ बैठका होणार आहेत.” ते म्हणाले, “मी सर्व पक्षांना आवाहन करतो की अधिवेशन काळात विधीमंडळ आणि संसदेच्या इतर कामात विधायक योगदान द्यावे.”
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी समान नागरी कायद्याचा पुरस्कार केल्यानंतर काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. या मुद्द्यावरून संसदेतही गदारोळ होण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अधिवेशन जुन्या संसद भवनात सुरू होणार असून नंतर नव्या संसद भवनात बैठका होऊ शकतात.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App