राजस्थानला मिळणार ‘वंदे भारत’ची दुसरी भेट, पंतप्रधान मोदी दाखवणार हिरवी झेंडा

Goa Mumbai Vande Bharat Express

 जाणून घ्या कोणत्या मार्गावर धावणार  आणि किती असणार भाडे?

विशेष प्रतिनिधी

जोधपूर : प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर अखेर जोधपूरला लवकरच वंदे भारत ट्रेनची भेट मिळणार आहे. राजस्थानची दुसरी वंदे भारत ट्रेन जोधपूर ते साबरमती दरम्यान ७ जुलैपासून सुरू होणार आहे. त्याची ट्रायल रन ४ जुलैला प्रस्तावित आहे ७ जुलै रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी जोधपूरमधील भगत की कोठी रेल्वे स्थानकावरून व्हर्चुअली ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. उत्तर पश्चिम रेल्वेने याबाबतची तयारी जवळपास पूर्ण केली आहे. Rajasthan will get the second gift of  Vande Bharat Express  Prime Minister Modi will show the green flag

शुक्रवारी, रेल्वेने जोधपूर ते अहमदाबाद मार्गावर धावणाऱ्या सुमारे ११ गाड्यांच्या वेळेतही बदल केला आहे. जोधपूरच्या भगत की कोठी ते साबरमती (अहमदाबाद) दरम्यान वंदे भारत ट्रेन धावल्याने जोधपूर ते साबरमती दरम्यानचे अंतर सुमारे २ तासांनी कमी होईल. ही गाडी जोधपूरहून सकाळी सहा वाजता सुटेल आणि ७ स्थानकावर थांबेल.

जोधपूरहून साबरमतीला जाणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसच्या वेळापत्रकानुसार, वंदे भारत ट्रेन जोधपूरच्या भगत की कोठी रेल्वे स्थानकावरून सकाळी ६ वाजता निघून दुपारी १२.०५ वाजता साबरमती स्थानकावर पोहोचेल. यादरम्यान ही गाडी भगत की कोठी, पाली, फलना, सिरोहीमधील अबू रोड, गुजरातमधील पालनपूर, मेहसाणा स्थानकावर थांबते आणि साबरमतीच्या शेवटच्या स्थानकापर्यंत एकूण ७ स्थानकांवर थांबते. तसेच, ही गाडी साबरमतीपासून ४.४५ वाजता सुटेल आणि भगत की कोठी रेल्वे स्थानकावर रात्री १०.४५ वाजता पोहोचेल.

प्रवासी भाडे –

सध्या या ट्रेनचे भाडे रेल्वे मुख्यालयाने ठरवलेले नाही. पण राजस्थानच्या दुसऱ्या वंदे भारत ट्रेनच्या भाड्याचा विचार केला तर ८०० ते १५०० रुपयांच्या दरम्यान भाडे निश्चित केले जाऊ शकते, ज्यामध्ये एक्झिक्युटिव्ह क्लास, आरक्षण, सुपरफास्ट चार्ज, GST टॅक्स आणि केटरिंग चार्जेसचाही समावेश असेल.

आठवड्यातून ६ दिवस धावणार –

जोधपूर ते साबरमती दरम्यान धावणारी राजस्थानची दुसरी वंदे भारत ट्रेन सोमवार ते शनिवार आठवड्यातून ६ दिवस धावेल. रविवारी देखभाल दुरुस्तीमुळे ही गाडी रद्द राहणार आहे.

Rajasthan will get the second gift of  Vande Bharat Express  Prime Minister Modi will show the green flag

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात