समृद्धी महामार्गावरच्या अपघातातले मृत “देवेंद्रवासी” होतात, तर मुंबई बॉम्बस्फोटांतले मृत आणि गोवारी हत्याकांडातले मृत “पवारावासी” झाले होते का??, असा सवाल विचारण्याची वेळ दस्तूरखुद्द शरद पवारांनी आणली आहे!! Buldhana Bus Accident, if devendra fadnavis is responsible, then was pawar not responsible for govari massacre, Mumbai bomb blast and killari sastur earthquake??
कारण समृद्धी महामार्गावरच्या आजच्या बुलढाण्याच्या भीषण अपघाता संदर्भात काही गंभीर सूचना करताना पवारांनी अत्यंत खालच्या पातळीवर येऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यातूनच वर उल्लेख केलेला प्रश्न सूचला आहे!!
समृद्धी महामार्गावर अपघातात मृत पावलेले “देवेंद्रवासी” होतात, असे लोक म्हणतात, अशी आक्षेपार्ह टिपण्णी शरद पवारांनी आज पुण्यातल्या पत्रकार परिषदेत केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आपण किती खार खाऊन आहोत, हे पवारांनी अनेकदा दाखवून दिले आहे. 2019 च्या निवडणुकीत देवेंद्र फडणवीसांबद्दल सोलापूरच्या सभेत बोलताना पवारांनी तृतीय पंथीयांसारखे हातवारे करून “यांच्यासारख्यांशी” आमची कुस्ती होत नसते, असे उद्गार काढले होते. पण त्याच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 105 आमदार निवडून आणून पवारांना निवडणुकीत धोबीपछाड दिला होता.
2019 च्याच निवडणुकीत जनतेने दिलेला कौल डावलून शरद पवारांनी पुढाकार घेऊन महाविकास आघाडी सरकार स्थापन केली. या पार्श्वभूमीवर पवार विरुद्ध फडणवीस अशी राजकीय जुगलबंदी सुरू असताना पवारांनी बुलढाण्याच्या अपघातावरून राजकीय शेरेबाजी करून आपली पातळी घसरल्याचे दाखवून दिले. समृद्धी महामार्गावरील अपघातात जे मरण पावतात, ते “देवेंद्रवासी” होतात, असे लोक म्हणतात, असे पवार म्हणाले. पवारांच्या मनात देवेंद्र फडणवीस यांच्या विषयीचा राग मनात किती ठासून भरला आहे, हेच यातून दिसते!!
उपदेशी पवार
एरवी पवार महाराष्ट्राला विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस सोडून इतर पक्षाच्या नेत्यांना महाराष्ट्र कसा सुसंस्कृत आहे, महाराष्ट्राची राजकीय संस्कृती इतर राज्यांपेक्षा कशी वेगळी आहे, या उपदेशाचे डोस पाजत असतात. पण हेच उपदेशाचे डोस स्वतः मात्र पवार आज विसरले आणि अपघाता सारख्या गंभीर विषयात देखील राजकीय टीका टिपण्णी करताना पातळी घसरल्याचे त्यांनी दाखविले.
पवारांचा अहंगंड दुखावला
पण त्या पलीकडे जाऊन फडणवीसांविषयी पवारांच्या मनातला जो राग आणि द्वेष दिसला, त्याचे मूळ पवारांच्या राजकीय कारकीर्दीत आहे. महाराष्ट्रात जो कुठला भव्य दिव्य प्रकल्प होतो, त्यात आपण कुठेतरी असतो किंबहुना आपणच त्यांना चालना देतो, याचा पवारांना अहंगंड आहे. मुंबई – नागपूर महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्ग तयार करताना फडणवीसांनी पवारांचा हा अहंगंड दुखावला आहे. पवारांची “विकास पुरुष” ही प्रतिमाच फडणवीसांनी भंग केली आहे. कारण त्या महामार्गाची संकल्पना आणि अंमलबजावणी यात “पवार” कुठेच नाहीत. त्या महामार्गाला पवारांच्या नावाचा अथवा राजकीय कर्तृत्वाचा कुठलाही स्पर्श नाही. इतकेच काय, तर त्यांचे कट्टर राजकीय विरोधक बाळासाहेब ठाकरे यांचे नाव त्या समृद्धी महामार्गाला शिंदे – फडणवीस यांनी दिले. त्यामुळे पवार हे फडणवीस यांच्यावर खार खाऊन आहेत. यातूनच अपघातासारख्या गंभीर विषयात पवारांनी त्यातल्या मृतांचीही खालच्या पातळीवरून चेष्टा केली.
‘पवारांचे टीकेचे सूत्र मागे नेले तर…
पण पवारांचेच टीकेचे हे सूत्र थोडे मागे चालवायचे म्हटले, तर 1990 च्या दशकात मध्ये झालेल्या गोवारी हत्याकांडातले मृत हे “पवारवासी” झाले होते, असे म्हणायचे का?? बुलढाण्याचा तर अपघात होता, पण गोवारी हत्याकांडाच्या वेळी तर पवार सत्तेवर होते आणि त्यांच्याच आदेशातून गोवारी हत्याकांडाचे पाप घडले. त्यावेळी पवारांच्या “कार्यक्षम” प्रशासनाने कुठलीच काळजी घेतली नव्हती. पवार त्या गोवारींना साधे भेटायला देखील गेले नव्हते. मग त्या गोवारी हत्याकांडांत जे मरण पावले, ते शेकडो मृत गोवारी हे “पवारवासी” झाले असे म्हणायचे का??
एरवी पवार “डिझास्टर मॅनेजमेंट” मध्ये कसे भारी आहेत?, असे त्यांचे समर्थक सांगत असतात. पण पवारांच्याच कारकीर्दीत किल्लारी आणि सास्तूरचा भूकंप झाला. त्या भूकंपात पवारांनी अहोरात्र काम केले, असे कौतुक मराठी माध्यमे करतात. मग त्या भूकंपग्रस्तांचे पुनर्वसन पवारांनी त्यांना “बारामतीवासी” करून केले का??, हा प्रश्नही विचारला पाहिजे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे शरद पवारांच्याच कारकिर्दीत मुंबईत बॉम्बस्फोट झाले. 250 हुन अधिक निरपराध मारले गेले. मग ते सगळे “पवारवासी” झाले का??, हा प्रश्न विचारला तर त्यात काय गैर आहे??
कारण पवारांनीच “देवेंद्रवासी” हा शब्द वापरून हे लॉजिक लावले आहे ना!!, की समृद्धी महामार्गावर अपघातात मृत्यू झालेले “देवेंद्रवासी” होतात, मग मुंबई बॉम्बस्फोटातले मृत, गोवारी हत्याकांडातले मृत आणि त्याचवेळी किल्लारी – सास्तूरच्या भूकंपातील मृत “पवारवासी” होऊन बसलेत असे म्हणायचे का??, हा “मिलियन डॉलर क्वेश्चन” आहे!!
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App