लष्कराने ड्रोनच्या मदतीने केली कारवाई
विशेष प्रतिनिधी
जम्मू -काश्मीर : उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. रविवारी रात्री उशीरा येथे शोध मोहीम राबवण्यात आली. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कर अलर्ट मोडवर आहे. संपूर्ण परिसराला सुरक्षा दलांनी वेढा घातला होता. A terrorist hiding in Kashmirs Bandipora was killed
लपलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी ड्रोनचा वापर करण्यात आला. मारल्या गेलेल्या दहशतवाद्याकडे एम 4 रायफल सापडली आहे. उल्लेखनीय आहे की, यापूर्वी जम्मू भागात एकापाठोपाठ एक दहशतवादाच्या चार घटना घडल्यानंतर आज चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान जम्मूमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. ते येथे एक महत्त्वाची बैठकही घेणार आहेत.
केंद्रीय गृह मंत्रालयाने जम्मूच्या रियासी भागात प्रवासी बसवर झालेल्या हल्ल्याची चौकशी एनआयएकडे सोपवली आहे. त्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. NIA ने याप्रकरणी UAPA अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हा हल्ला 9 जून रोजी झाला होता. या हल्ल्यात दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील रियासीमध्ये यात्रेकरूंच्या बसवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. त्यामुळे बसचा तोल बिघडला. या हल्ल्यात नऊ प्रवाशांचा मृत्यू झाला. 9 जून रोजी सायंकाळी 6.15 च्या सुमारास हा हल्ला झाला. दहशतवाद्यांनी बसवर गोळीबार केला. यानंतर बसचे नियंत्रण सुटले आणि ती खोल दरीत कोसळली. येथेही दहशतवादी लपून बसले होते.
जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील एका गावात दहशतवादी लपल्याची बातमी आली होती. दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये झालेल्या चकमकीत आतापर्यंत दोन दहशतवादी ठार झाले आहेत. येथे शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे. कठुआ जिल्ह्यातील एका गावात झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर सुरक्षा दलांनी कारवाई सुरू केली होती. येथे हिरानगर सेक्टरमधील सैदा सुखल गावात गेल्या मंगळवारी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App