महाराष्ट्रातील एकूण १२ किल्यांचा यात समावेश करण्यात आला आहे.
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. 2024-25 या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.A proposal to include the forts in the World Heritage List was submitted to UNESCO
यात किल्ले रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या 12 किल्ल्यांचा समावेश आहे.
हा प्रस्ताव सादर केल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे आभार मानले आहेत.
भारतीय इतिहासातील शूर, पराक्रमी, सहिष्णू, जाणता राजा आपले आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर म्हणजे गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठी भारत सरकारने 2024-25 या वर्षासाठी युनेस्कोला प्रस्ताव सादर केला आहे. अशी माहिती केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीटद्वारे दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App