केरळ मध्ये प्रोफेसरवर झाला होता सलमान रश्दी यांच्यासारखाच हल्ला!!; मीडियाने दखल न घेतलेल्या हल्ल्याची कहाणी!!


प्रतिनिधी

तिरुअनंतपुरम : “सॅटॅनिक व्हर्सेस” कादंबरीचे लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमध्ये झालेल्या हल्ल्याची जागतिक पातळीवर चर्चा सुरू आहे. या हल्ल्याची निंदा देखील झाली आहे. पण भारतात केरळमध्ये असाच एका प्रोफेसरवर बारा वर्षांपूर्वी हल्ला झाला होता. त्याची दखलही त्यावेळी भारतीय अथवा जागतिक मीडियाने घेतलेली नव्हती. सलमान रश्दी यांच्यावर ईश्वरनिंदा केल्याचा आरोप आहे आणि त्यांच्याविरुद्ध इराणचा सर्वोच्च नेता आयतुल्ला खोमनी यांनी मारण्याचा फतवा देखील जारी केला आहे. त्यावेळी 1986 पासून सलमान रश्दी यांचा जीव धोक्यात आहे.A professor was attacked in Kerala like Salman Rushdie!!; The story of the attack that was not noticed by the media!!

या प्रकरणाची जागतिक पातळीवर वारंवार चर्चा होत असते पण केरळमध्ये अशाच प्रकारे केवळ मोहम्मद या नावाचा उल्लेख असलेला एक प्रश्न बी. कॉम.च्या सेकंड इयरच्या पेपरमध्ये विचारला गेला होता. त्यावरून कट्टरपंथीयांनी प्रोफेसर जोसेफ यांच्यावर हल्ला केला होता. त्यांचा उजवा हात तोडला होता. या कहाणी बद्दल मात्र त्या वेळेचा मीडिया मूग गिळून गप्प होता. प्रोफेसर जोसेफ सध्या आयर्लंडमध्ये आहेत. ते उघडपणे व्हिडिओवर येऊन बोलायला तयार नाहीत. मात्र, त्यांनी आपल्यावर झालेल्या हल्ल्या संदर्भात आणि कट्टरपंथीयांच्या संदर्भात एक पुस्तक लिहिले आहे. त्याची दखल आता मीडिया घेतो आहे.



बारा वर्षांपूर्वीची घटना

12 वर्षांपूर्वीची ही या हल्ल्याची घटना आहे. प्रोफेसर जोसेफ हे त्यांच्या कुटुंबीयांसह चर्चमध्ये जात असताना कट्टर इस्लामी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया पीएफआयच्या कट्टरपंथीय सदस्यांनी तलवारी चाकू आणि त्यांच्यावर हल्ला केला होता. ज्या उजव्या हाताने तू लिहितोस तो उजवा हातच तोडतो असे म्हणून त्यांचा हात तोडून टाकला होता. या हल्ल्याचा धसकाच एवढा मोठा होता की त्यानंतर चार वर्षांनी प्रोफेसर जोसेफ यांच्या पत्नीने आत्महत्या केली. त्यांचे जीवनच उध्वस्त झाले. कुटुंब विखुरले गेले. प्रोफेसर जोसेफ सध्या एका मुलीकडे आयर्लंड मध्ये राहत आहेत आणि तेथूनच त्यांनी दैनिक भास्करला आपल्या जीवनाची कहाणी सांगितली आहे.

सुमारे 12 वर्षांपूर्वी मी कारमधून चर्चला निघालो होतो. सात-आठ लोकांनी अचानक माझ्या कारला घेरले. कारची काच फोडली आणि त्यांनी मला खेचून बाहेर काढले. माझ्यावर ते सतत वार करत राहिले. यात माझा हात तुटला. अखेर माझ्या मुलाने हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 16 तास शस्त्रक्रिया चालली. माझा जीव बचावला पण जीवन उध्वस्त झाले, असे त्यांनी स्पष्ट सांगितले. परंतु आपल्यावर हल्ला कसा झाला नेमके कारण काय होते या मागचा उलगडा त्यांनी एका पुस्तकात केला आहे.

प्रोफेसर टी. जे. जोसेफ केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यात राहत होते. त्यांचे घर मुवात्तुपूजा इलाक्यात होते. प्रोफेसर जोसेफ यांनी 2010 मध्ये बीकॉम सेकंड ईयर च्या परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार केली. त्यामध्ये त्यांनी मोहम्मद असे नाव लिहिले होते. हाच 11 वा प्रश्न मोहम्मद पैगंबर यांची बदनामी आहे, असे म्हणून कट्टरपंथीयांनी 4 जुलै 2010 रोजी त्यांच्यावर हल्ला केला होता.

प्रोफेसर जोसेफ यांच्या हल्ल्यावरचा तपास सध्या राष्ट्रीय तपास संस्था एनआयए करत आहे. या तपासात कोणताही अडथळा उत्पन्न होऊ नये यासाठी प्रोफेसर जो असेल या हल्ल्याविषयी तपशीलवार माहिती देत नाहीत. प्रोफेसर जोसेफ हिंदी किंवा इंग्रजी जाणत नाहीत त्यामुळे त्यांनी मल्याळमले जे सांगितले त्याचा तर्जुमा त्यांची मुलगी एमी हिने सांगितला. तो दैनिक भास्करने हिंदीत प्रसिद्ध केला आहे.

उजवा हात तोडला

पीएफआय च्या आठ – दहा लोकांनी आपल्यावर हल्ला केला ज्या उजव्या हाताने तू प्रश्नपत्रिका लिहिलीस आणि मोहम्मद पैगंबरांची निंदा केलीस तो हात शिल्लक राहणार नाही त्यामुळे तू लिहू शकणार नाहीस, असे हल्लेखोर बोलत होते, असे म्हणून त्यांनी उजव्या हातावर सतत वार केले. या हल्ल्याच्या वेळी माझी बहीण, आई दोघी ओरडत होत्या परंतु हल्लेखोर त्यांच्यावर तुटून पडले. त्यांनी त्यांना बाजूला केले नंतर दुसऱ्या कारमधून माझा मुलगा आला तेव्हा मी फक्त त्याला मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चल एवढेच सांगू शकलो त्यानंतर मी बेशुद्ध झालो. त्यानंतर आमच्या जीवनात संपूर्ण भीती पसरली होती या भीतीपोटीच माझ्या पत्नीने आत्महत्या केली. केरळच्या निर्माण कॉलेजमध्ये ते शिकवत होते या घटनेनंतर त्यांना नोकरी गमवावी लागली स्थानिक मीडिया देखील त्यांच्याविरुद्ध संशयाचे वातावरण पसरवत होता काँग्रेस, डाव्या पक्षांनी त्यांच्याविरुद्ध आंदोलने केली होती एक प्रकारे पीएफआय सारख्या संघटनेला या आंदोलनातून फुसच मिळाली.

– मूळ पुस्तक पी. टी. कुंजू मोहम्मद यांचे

फिल्म डायरेक्टर पी. टी. कुंजू मोहम्मद यांचे एक पुस्तक होते. “थिराकथायुदे, रीथी शास्त्रम”, हे पुस्तक केरल स्टेट इन्स्टीट्यूट ऑफ लैंग्वेज ने प्रकाशित केले होते. या पुस्तकातलाच एक पैराग्राफ प्रश्नपत्रिका साठी घेतला होता. कुंजू मोहम्मद ने आपली फिल्म “गरसम” मधून या पुस्तकासाठी कंटेंट घेतला होता.

या पुस्तकात सिझोफ्रेनिया झालेली एक व्यक्ती ईश्वरा बरोबर रागावून संवाद करत असते याच पुस्तकातल्या एका पॅरेग्राफर आधारित प्रश्न विचारला होता या पुस्तकात सिझोफ्रेनिया पिढीत व्यक्तीचे नाव नसरुद्दीन होते परंतु पिटी कुंजू मोहम्मद यांच्या नावाशी मिळते जुळते म्हणून मी प्रश्नात फक्त मोहम्मद नाव घेतले पण हाच माझा “गुन्हा” ठरवला गेला.

कट्टरपंथीयांना हा प्रश्न आवडला नाही आणि परीक्षा झाल्यानंतर एका आठवड्याने त्याच्याविरुद्ध आंदोलन सुरू केले प्रश्नपत्रिका झेरॉक्स काढून सगळ्या इलाक्यात वाटण्यात आली. स्वर हिंदीच्या आरोपाखाली मला अटक झाली मी अटकेत असतानाच राज्यभर हा मुद्दा पेटवण्यात आला कॉलेजने देखील मला सपोर्ट केला नाही. मला मेमो देऊन लिखित उत्तर मागितले मी लिखित उत्तर दिले. परंतु माझ्या विरोधातले कोणी माझ्या ऐकूनच घ्यायला तयार नव्हते.

केरळ पोलिसांची कारवाई

केरळ पोलिसांनी माझ्याविरुद्ध फौजदारी कायद्यातील 295 कलम लावले ज्यामध्ये धार्मिक भावना भडकवण्याचा मुद्दा प्रभाव होता. त्यातून मला अटक झाली. तुरुंगात राहावे लागले. नंतर मला जामीन मिळाला पण तोपर्यंत राज्यभरात माझ्याविरुद्ध वातावरण पेटले होते. त्यानंतर माझ्यावर दोन महिन्यांमध्ये चार वेळा हल्ले झाले. साथ मे 17 मे 28 मे आणि चार जुलै 2010 अशा चार वेळा हे हल्ले मला सहन करावे लागले कॉलेजने तर मला नोकरीवरून काढून टाकले होते. पहिल्या तीन हल्ल्यांमध्ये माझ्या बचाव झाला. पण चौथ्या हल्ल्याच्या वेळी मात्र माझ्या सकट माझे कुटुंब उध्वस्त झाले.

केरळ मधल्या ख्रिश्चन समाजाने देखील माझ्यावर बहिष्कार घातला चर्च पासून सार्वजनिक ठिकाणांवर माझ्या वावराला प्रतिबंध घातला या सामाजिक बहिष्कार मुळे माझे पत्नी पूर्ण खचून गेली आणि चार वर्षांनी तिने आत्महत्या केली.

जोसेफ यांनी ज्या भयानक अनुभवावरच जे पुस्तक लिहिले आहे, त्याचा इंग्रजी अनुवादही प्रसिद्ध झाला आहे. “A Thousand Cuts: An Innocent Question and Deadly Answers” केरळ साहित्य अकादमीने या पुस्तकाला पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे त्यामुळे जोसेफ यांच्या या खोलवर गेलेल्या जखमांवर थोडे का होईना आपण मलम लावले गेले आहे.

जोसेफ यांच्यावरील हल्ल्यात पीएफआय नसल्याचा दावा

मात्र जोसेफ यांच्यावरील हल्ल्यात पीएफ फाईल असल्याचा दावा त्या संघटनेचे सरचिटणीस अनिस अहमद यांनी केला आहे केरळ हायकोर्टाने पीएफ आला या प्रकरणात 2010 मध्येच क्लीन चीट दिल्याचा त्यांनी म्हटले आहे आता एनआयएने जो तपास सुरू केला आहे, त्यात तपासात पीएफआय त्यांना सहकार्य करेल, असे अनिस अहमद यांनी म्हटले आहे.

A professor was attacked in Kerala like Salman Rushdie!!; The story of the attack that was not noticed by the media!!

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात