विशेष प्रतिनिधी
अहमदाबाद : भारत-पाकिस्तान सागरी सीमेवर गस्त घालत असताना सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) सोमवारी एका पाकिस्तानी नागरिकाला पकडले आणि गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील खाडी प्रदेशातून तीन मासेमारी नौका जप्त केल्या. अधिकृत निवेदनात ही माहिती देण्यात आली. A Pakistani man was arrested in Kutch Three fishing boats seized
पाकिस्तानी घुसखोर, जो मच्छीमार असल्याचे दिसून आले, त्याला पकडण्यात आले, तर इतर चार मच्छिमार खाडी प्रदेशात बीएसएफच्या गस्ती नौका पाहिल्यानंतर पाकिस्तानी हद्दीत पळून जाण्यात यशस्वी झाले.
बीएसएफच्या गस्ती नौका पाहून पाकिस्तानी घुसखोरांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, बीएसएफच्या गस्ती पथकाने त्यांचा पाठलाग करून एका पाकिस्तानी मच्छिमाराला पकडले आणि त्याच्या तीन बोटी जप्त केल्या,
तर उर्वरित मच्छीमारांनी त्याचा फायदा घेत पळ काढला. चिखल आणि दलदलीचा प्रदेश यातून पाकिस्तानच्या दिशेने पळून जाण्यात यशस्वी झाले. जप्त केलेल्या तीन बोटींची झडती घेण्यात आली, मात्र त्यांच्याकडून काहीही संशयास्पद आढळले नाही.
निवेदनात म्हटले आहे की, गस्त घालत असताना, बीएसएफने चार-पाच मच्छिमारांना घेऊन जाणाऱ्या पाकिस्तानी मासेमारी नौकांच्या हालचाली पाहिल्या. अशांत समुद्राच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांनी भारतीय हद्दीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App