‘चांद्रयान-3’च्या यशस्वी प्रक्षेपणाने नवा इतिहास रचला जाणार! भारत चंद्रावर अंतराळ यान उतरवणारा चौथा देश ठरणार

केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी ट्वीटद्वारे दिली माहिती, जाणून  घ्या चांद्रायान मोहिमेचा इतिहास

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : अंतराळाच्या जगात भारत या आठवड्यात एक नवा इतिहास रचणार आहे. इस्रो चांद्रयान-3 लाँच करण्यासाठी सज्ज आहे. चांद्रयान-३ च्या प्रक्षेपणामुळे भारत चंद्राच्या पृष्ठभागावर आपले अंतराळ यान उतरवणारा चौथा देश बनेल. कारण, आतापर्यंत हे काम रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच साध्य केले आहे. केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, चांद्रयान-3 या आठवड्यात श्रीहरिकोटा येथून प्रक्षेपित केले जाईल. चांद्रयान-3 च्या प्रक्षेपणामुळे, भारत चंद्रावर आपले अंतराळ यान उतरवणारा चौथा देश बनेल. A new history will be created with the successful launch of Chandrayaan 3 India will be the fourth country to land a spacecraft on the moon

केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकत्याच झालेल्या अमेरिका दौऱ्यामुळे अंतराळाशी संबंधित महत्त्वाचे करार झाले, यावरून असे दिसून येते की ज्या देशांनी आपला अवकाश प्रवास भारताच्या खूप आधीपासून सुरू केला होता, ते देश आज भारताला समान भागीदार म्हणून पाहत आहेत. केंद्रीय राज्यमंत्री म्हणाले की, चांद्रयान-3 हे चांद्रयान-2 चा फॉलोअप मिशन आहे. चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे आणि भारताची क्षमता प्रदर्शित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे. ते म्हणाले की, चांद्रयान-3 उच्च पातळीवर काम करेल.

14 जुलै रोजी चांद्रयान-3 चे प्रक्षेपण

चांद्रयान-3 हा इस्रोचा ड्रीम प्रोजेक्ट आहे. चांद्रयान-3 चे प्रक्षेपण 14 जुलै रोजी दुपारी 02.35 वाजता होणार आहे. इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांनी सांगितले की, चांद्रयान-3 मोहिमेअंतर्गत इस्रो 23 ऑगस्ट किंवा 24 ऑगस्ट रोजी चंद्रावर ‘सॉफ्ट लँडिंग’ करण्याचा प्रयत्न करेल.

चांद्रायान मोहिमेचा थोडक्यात इतिहास  –

‘चांद्रयान-१’ हे भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या चंद्रावरील मोहिमेचा पहिला टप्पा घेऊन जाणारे अंतराळ यान होते. ‘चांद्रयान-१’ हे मानवरहित अंतरीक्षयान होते, त्यामध्ये चंद्राला प्रदक्षिणा मारणारा एक तसेच चंद्रावर आदळणारा एक असे दोन भाग होते. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाची प्रगत पिढी (पी.एस.एल.व्ही.-सी ११) या प्रक्षेपकाद्वारे चांद्रयानाचे प्रक्षेपण २२ ऑक्टोबर २००८ रोजी श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झाले. नोव्हेंबर 200८ रोजी यानास यशस्वीरीत्या चंद्राच्या कक्षेत टाकण्यात आले. १४ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजून ६ मिनिटांनी यानाला जोडलेला मून इम्पॅक्ट प्रोब यशस्वीरीत्या वेगळा करण्यात आला. जवळपास २५ मिनिटांच्या प्रवासानंतर हा प्रोब चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळील‘शॅकलटन क्रेटर’ येथे आदळला. या घनाकृती प्रोबच्या चारही बाजूला भारताचा ध्वज चितारला असल्यामुळे प्रतीकात्मकरीत्या भारतीय ध्वज चंद्रावर पोहोचला व हे साध्य करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला.

https://youtu.be/ywLGDoVuMYs

चांद्रयान-2 ही खरं तर चंद्रयान-1 मिशनची नवीन आवृत्ती होती. 22 जुलै 2019 रोजी श्रीहरिकोटा रेंजमधून याला फ्लॅग ऑफ करण्यात आले. त्यात ऑर्बिटर, लँडर (विक्रम) आणि रोव्हर (प्रज्ञान) यांचा समावेश आहे. चांद्रयान-1 मध्ये फक्त ऑर्बिटर होते, जे चंद्राच्या कक्षेत फिरत होते. 6 सप्टेंबर 2019 रोजी, इस्रोने चांद्रयान-2 च्या माध्यमातून चंद्राच्या पृष्ठभागावर उतरण्याचा पहिला प्रयत्न केला. या मोहिमेमध्ये शेवटपर्यंत सर्व काही सुरळीत पार पडले, पण लँडिंगच्या अवघ्या 500 मीटरवर लँडरचा संपर्क तुटला.

A new history will be created with the successful launch of Chandrayaan 3 India will be the fourth country to land a spacecraft on the moon

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात