‘’पोलीस आणि नागरिक हे परस्परांना पूरक’’ असल्याचेही सांगितले आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय, कुलाबा येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी अर्धवार्षिक परिषद आज संपन्न झाली. यावेळी राज्यातील पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणारी पोलीस स्टेशन आणि अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानित करण्यात आले. People should respect and support the police Chief Minister Eknath Shinde
याप्रसंगी मुख्य सचिव मनोज सौनिक, अपर मुख्य सचिव सुजाता सौनिक, पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांच्यासह राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘’पोलीस आणि नागरिक हे परस्परांना पूरक आहेत. नागरिकांशी आपण संपर्क वाढविणे गरजेचे आहे.’’ तसेच, पोलिसांबद्दल लोकांना आदर आणि आधार वाटायला हवा. अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली.
याशिवाय ‘’पोलीस, रुग्णवाहिका सेवा देणारे आणि अग्निशमन दल यांनी योग्य समन्वय साधला तर अधिक प्रभावीपणे काम करता येणे शक्य होईल. आज परिषदेत राज्यातील सर्वच प्रमुख पोलीस अधिकारी एकत्र आले असून पोलीस दलाला अधिक सक्षम आणि संवेदनशील बनविण्यावर यावेळी चर्चा व्हावी.’’ अशी अपेक्षाही यावेळी बोलताना व्यक्त केली आणि पोलीस दल अधिक सक्षम बनविण्यासाठी शासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असे आश्वासन दिले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more