वैष्णोदेवी मंदिरात प्रचंड गर्दी उसळली ; चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू

दरवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो भाविक वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी येत असतात.A huge crowd erupted at the Vaishnodevi temple; Twelve devotees killed in riots


वृत्तसंस्था

जम्मू काश्मीर : माता वैष्णोदेवी मंदिर परिसरात चेंगराचेंगरी झाल्याची धक्कदायक घडली आहे.नववर्षाचे स्वागत करण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली असतांना रात्री उशीरा झालेल्या चेंगराचेंगरीत १२ भाविकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान हा आकडा अजून वाढण्याची शक्यता आहे.



दरवर्षी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी हजारो भाविक वैष्णोदेवी मंदिरात दर्शनासाठी येत असतात.दरम्यान यावर्षी कोरोनाचा प्रकोप असतांनाही हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते.दरम्यान रात्री दोन वाजता काही भाविकांमध्ये वाद झाला.या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. यामुळे हजारो भाविकांची पळापळ सुरू झाली.

या पळापळीत १२ जणांचा मृत्यू झाला आहे.तर २० पेक्षा जास्त जखमी झाले आहेत.त्या जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. चेंगराचेंगरीनंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रूग्णालयात दाखल केले. तर आता मंदिर परिसरातून भाविकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले आहे.

A huge crowd erupted at the Vaishnodevi temple; Twelve devotees killed in riots

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात