100 हून अधिकजण या भव्य होर्डिंग्जच्या खाली दबल्याची माहिती समोर आली आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राची राजधानी मुंबईत सोमवारी दुपारी वादळाचा तडाखा बसला. जोरदार वादळामुळे मुंबईतील घाटकोपर भागात पेट्रोल पंपावर मोठा होर्डिंग पडला. पेट्रोल पंपावर लोक आपल्या वाहनात पेट्रोल भरत होते. तेवढ्यात हा अपघात झाला. लोकांना काही समजण्यापूर्वीच लोखंडी अँगलसह संपूर्ण होर्डिंग पेट्रोल पंपावर पडले. या अपघातात सुमारे 37 जण गंभीर जखमी झाले आहेत. 100 हून अधिक लोक होर्डिंगखाली अडकले आहेत.A hoarding on a petrol pump collapsed due to storm in Ghatkopar area of Mumbai 37 injured
सोमवारी दुपारी झालेल्या भीषण वादळात वाऱ्याचा वेग ताशी 40 ते 50 किमी होता. सोसाट्याचा वारा पाहून अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये घबराट पसरली. घाटकोपरच्या पेट्रोल पंपावर होर्डिंग पडल्याची घटनाही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत 54 जणांना ढिगाऱ्याखालून वाचवण्यात यश आले आहे. 51 जखमींना राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 3 जखमींना एचबीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्व जखमींची प्रकृती स्थिर आहे. या दुर्घटनेत अद्याप कोणाच्याही मृत्यूचे वृत्त नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App