गंगेत स्नान करण्यासाठी गेले होते, स्थानिकांच्या मदतीने शोधकार्य सुरू A boat carrying 17 people capsized in Bihar leaving the boat stranded
विशेष प्रतिनिधी
पाटणा : बिहारमध्ये आज एक मोठी दुर्घटना घडली आहे. पाटणा जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील उमानाथ घाटावर 17 जणांनी भरलेली बोट बुडाली आहे. गंगा दसऱ्यानिमित्त बोटीतील लोक आंघोळीसाठी जात होते, मात्र पुराच्या पाण्यात अडकून अपघात झाला.
11 भाविक पोहत बाहेर आले, मात्र 6 भाविक बेपत्ता आहेत. काहींचा शोध सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी नदीवर एकच गर्दी केली होती. पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी बचाव कार्यासाठी गोताखोरांना पाचारण केले, जे नदीत बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. अपघाताची माहिती मिळताच बेपत्ता झालेल्यांच्या कुटुंबियांमध्ये घबराट पसरली आहे.
स्थानिक लोकही बचावकार्यात मदत करत आहेत. बेपत्ता लोकांचा लवकरच शोध लागेल, अशी सर्वांना आशा आहे. मात्र आतापर्यंत त्यांच्या हाती काहीही निष्पन्न झालेले नाही. या घटनेबाबत प्रशासनाने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App