वृत्तसंस्था
अहमदाबाद : आयसीसी वनडे वर्ल्डकपमध्ये रविवारी अफगाणिस्तानने इंग्लंडचा 69 रन्सने पराभव केला. इंग्लंडच्या चाहत्यांसाठी हा खूप मोठा धक्का होता. पण त्या पलीकडे या पराभवामुळे पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर झाला आहे. इंग्लंडच्या पराभवाचा फटका ऑस्ट्रेलियाला बसून पॉईंट्स टेबलवर मध्ये ऑस्ट्रेलिया तळात पोहोचली आहे.A big turnaround in the World Cup after the victory of Afghanistan
इंग्लंडला पराभूत केल्यानंतर अफगाणिस्तानने वनडे वर्ल्डकप 2023 च्या पॉईंट्स टेबलमध्ये आपले खाते उघडले. याचा फटका ऑस्ट्रेलियाचा टीमला देखील बसला आहे. हा सामना जिंकल्यानंतर पॉइंट टेबलमध्ये कोणते बदल झाले आहेत.
कसं आहे पॉईंट्स टेबलचं चित्र?
इंग्लंडविरूद्ध सामन्यात विजय मिळवून अफगाणिस्तानच्या टीमने वर्ल्डकपमध्ये त्यांचे पहिले 2 पॉईंट्स कमावले. यामुळे शेवटच्या स्थानावर असलेली अफगाणिस्तानची टीम थेट सहाव्या नबंरवर पोहोचली आहे. तर इंग्लंडची टीम 2 पराभवांसह पाचव्या क्रमांकावर आहे. आता पर्यंत तिन्ही सामन्यात विजय मिळवणारी टीम भारत पॉईंट्स टेबलमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे.
इंग्लंडच्या पराभवाचा ऑस्ट्रेलियाच्या टीमलाही मोठा फटका
पाच वेळा विश्वविजेती असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीमला वर्ल्डकपमध्ये एकाही सामन्यात विजय मिळवता आलेला नाही. रविवारी होणाऱ्या सामन्यापूर्वी अफगाणिस्तानची टीम 10 व्या नंबरवर होती. तर नवव्या क्रमांकावर ऑस्ट्रेलिया होती. मात्र अफगाणिस्तानच्या विजयाने ऑस्ट्रेलियाची टीम 10 क्रमांकावर पोहोचली आहे. त्यामुळे इंग्लंडच्या पराभवाचा मोठा फटका ऑस्ट्रेलियालाही बसल्याचं दिसून येतंय.
अफगाणिस्तानचा इंग्लंडवर मोठा विजय
वर्ल्ड कपमधील 13 व्या सामन्यात अफगाणिस्तानने डिफेन्डिंग चॅम्पियन इंग्लंडचा दारूण पराभव केला. वर्ल्ड कपमधील हा पहिला उलटफेर ठरलाय. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानची सुरूवात चांगली झाली. सलामीवीर रहमानउल्ला गुरबाज आणि इब्राहिम झद्रान यांनी वर्ल्ड कपमधील 114 धावांची विक्रमी भागेदारी केली. अखेर अफगाणिस्तानने 49.5 ओव्हरमध्ये 284 रन्स करत ऑलआऊट झाली.
अफगाणिस्तानने दिलेल्या 285 रन्सचं आव्हान पार करताना इंग्लंडची सुरूवात खराब झाली. जॉनी बेअरस्टो आणि जो रूट लवकर बाद झाले. त्यानंतर सलामीवीर डेविड मलान आणि हॅरी ब्रूक यांनी इंग्लंडला सावरलं. मात्र, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम करन, ख्रिस वोक्स आणि जॉस बटलर हे तगडे फलंदाज सपशेल फेल ठरले. अखेर अफगाणिस्तानच्या गोलंदाजीसमोर इंग्लंडच्या टीमने गुडघे टेकले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App