विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :1983 मध्ये क्रिकेटच्या मैदानात भारताने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाच्या आठवणींना उजाळा देत चाहते 83 या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून वाट पाहत आहेत. पण कोरोनामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. 83 First Review Out: Great! The golden moment of Team India’s historic performance; Masterpiece of Kabir Khan-Ranveer Singh
83 च्या आठवणींना उजाळा देणारा हा चित्रपट यावर्षी 24 डिसेंबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. दरम्यान, इंडस्ट्रीतील काही लोकांनी हा चित्रपट पाहिला आहे. त्यांनी कबीर खानच्या चित्रपटाचे वर्णन मास्टरपीस म्हणून केले आहे.
दिग्दर्शक कबीर खानची पत्नी मिनी माथूरने इंस्टा स्टोरीवर लोकांच्या रिव्ह्यूचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे.
या रिव्ह्यूजमध्ये चित्रपटाचे प्रचंड कौतुक झाले आहे. चित्रपट पाहिल्यानंतर लोक कौतुक करताना थकत नाहीयेत. 83 पाहिल्यानंतर लोकांच्या प्रतिक्रिया एवढ्या चांगल्या आहेत की तुमच्या मनात रणवीरच्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढेल. काहींनी या चित्रपटाला मास्टरपीस म्हटले तर काहींनी या चित्रपटाने त्याला गूजबंप दिल्याचे सांगितले. अभिनयापासून दिग्दर्शनापर्यंत सर्वच गोष्टींचे कौतुक झाले आहे.
83 ची स्टारकास्ट चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहे. 1983 सालचा तो अविस्मरणीय आणि कधीही न विसरणारा क्षण भारत पुन्हा एकदा जगणार आहे. रणवीर सिंग 83 मध्ये कपिल देव यांची भूमिका साकारत आहे. तर दुसरीकडे दीपिका पदुकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी भाटियाची भूमिका साकारताना दिसणार आहे.
हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरणार हे मात्र नक्की . तो केवळ हिंदीतच नाही तर इतर भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App