आक्रितच, उत्तर कोरियातील नागरिकांना अकरा दिवस हसण्यास बंदी


विशेष प्रतिनिधी

सेऊल : उत्तर कोरियातील नागरिकांना पुढील अकरा दिवस हसण्यावरच बंदी घालण्यात आली आहे. या काळात घरातील व्यक्तीचे निधन झाले तरी त्यांना रडण्याचीही परवानगी नाही.माजी नेता किम जोंगच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त 11 दिवस हसण्यावर आणि दारू पिण्यास बंदी घालण्यात आली आहे.North Koreans have been banned from laughing for 11 days

या काळात नागरिकांना आनंदाची कोणतीही चिन्हे दाखवण्यास मनाई करण्यात आला आहे. 1994 पासून 2011 मध्ये त्याच्या मृत्यूपर्यंत उत्तर कोरियावर राज्य करणाºया किम जोंग च्या मृत्यूच्या स्मरणार्थहा आदेश देण्यात आला आहे. त्यांच्या मृत्यूनंतर तिसरा आणि सर्वात लहान मुलगा किम जोंग उन याने नेतृत्वाची सूत्रे हाती घेतली.



शोक काळात, आपण मद्यपान करू नये, हसू नये किंवा विश्रांतीच्या क्रियाकलापांमध्ये गुंतू नये,असे सांगण्यात आले आहे. तुमच्या कुटुंबातील सदस्याचा शोक काळात मृत्यू झाला तरी तुम्हाला मोठ्याने रडण्याची परवानगी नाही आणि ते संपल्यानंतर मृतदेह बाहेर काढला पाहिजे. लोक या काळात स्वत:चा वाढदिवसही साजरा करू शकत नाहीत.

यापूर्वीही शोक काळात मद्यपान करताना किंवा नशा करताना पकडलेल्या अनेक लोकांना अटक करण्यात आली होती. त्यांना वैचारिक गुन्हेगार म्हणून वागणूक दिली जात होती. त्यातील अनेक जण आता गायब झाले आहेत.

North Koreans have been banned from laughing for 11 days

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात