विशेष प्रतिनिधी
दिल्ली : टी सी एस ही भारतातील सर्वात मोठी आयटी कंपनी आहे. 2022 या वर्षी कंपनी एकूण 78,000 फ्रेशर्सना जॉब देणार आहे असे नुकताच कंपनीने जाहीर केले आहे. 2021 ह्या वर्षी एकूण 40,000 लोकांना कंपनीने हायर केले होते. तसेच 21 फेब्रुवारी 2022 ते 27 फेब्रुवारी 2027 या कालावधी साठी राजेश गोपीनाथन यांची 5 वर्षांसाठी सीईओ म्हणून पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे.
78000 Jobs! TCS will hire freshers in 2022
सप्टेंबर 2021 पर्यंत कंपनीने 19,690 कर्मचारी हायर केले होते. कंपनीने याआधी असे जाहीर केले होते की, 2021 प्रमाणे 2022 मध्ये 40,000 फ्रेशर्स घेण्यात येतील. सप्टेंबर 2021 पर्यंत कंपनीची एकूण कर्मचारी संख्या 528,748 इतकी होती. मुख्य मनुष्यबळ अधिकारी मिलिंद लकड यांनी म्हंटले आहे की, सध्या आय टी सेक्टर मध्ये खूप ओपनिंगज येतील.
Bumper TCS Jobs : सुवर्णसंधी ! TCS च्या Rebegin या उपक्रमाच्या माध्यमांतून बंपर भरती;Rebegin साठी असा करा अर्ज
TCS ने तिमाहीत 46,867 कोटी रुपयांची कमाई केली आहे, दरवर्षी 16.8 टक्क्यांनी (YoY) आणि 9,624 कोटी रुपये निव्वळ नफ्यात, 14.1 टक्के YoY वाढ, जी बाजाराच्या अंदाजापेक्षा कमी आहे. कंपनीने 2021 या वर्षात मोठ्या डील साइन केल्या आहेत. उत्तर अमेरिका मधील बँकिंग आणि आर्थिक सेवा, उत्पादन क्षेत्रातील हे प्रोजेक्ट्स आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App