Bumper TCS Jobs : सुवर्णसंधी ! TCS च्या Rebegin या उपक्रमाच्या माध्यमांतून बंपर भरती;Rebegin साठी असा करा अर्ज


विशेष प्रतिनिधी

मुंबई : टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये (TCS) नोकरी शोधणाऱ्या महिलांसाठी लवकरच मोठी पदभरती (TCS jobs for women) होणार आहे.TCS च्या Rebegin या उपक्रमाच्या माध्यमातून ही भरती केली जाणार आहे. Rebegin हा TCSचा एक उपक्रम आहे जो प्रतिभावान महिला प्रोफेशनलना त्यांच्या कारकीर्दीला योग्य पात्रता देण्याची संधी प्रदान करतो. त्यामुळे महिलांना आता IT क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्याची तसंच नोकरी करण्याची मोठी संधी प्राप्त होणार आहे. Bumper TCS Jobs: Golden Opportunity! Bumper Recruitment through TCS’s Rebegin Initiative; Apply for Rebegin

सध्या TCS ही जॉब ची संधी अशा महिलांना देऊ इच्छित आहे ज्यांना काही कारणास्तव आपला जॉब सोडावा लागला होता मात्र आता त्या पुन्हा जॉब करू इच्छितात.

मात्र यासाठी त्यांच्याकडे कमीतकमी दोन वर्षांचा सलग IT सेक्टरमध्ये काम करण्याचा अनुभव असणं आवश्यक आहे. ‘आम्ही TCS मध्ये प्रतिभा जपतो ज्यांना विश्वास आहे की ते त्यांच्या अद्वितीय कौशल्य आणि दृष्टीकोनातून जग बदलू शकतात. जर तुम्ही त्यापैकी एक असाल, तर आकांक्षी प्रतिभांसाठी डिझाइन केलेले आमचे विशेष नियुक्ती उपक्रम सादर करण्यास आम्ही उत्सुक आहोत.’ असं TCS नं म्हंटल आहे.या वर्षी जूनमध्ये, TCS नं 20,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती केली, जी कोणत्याही तिमाहीत सर्वाधिक भरतींपैकी एक आहे. TCS मध्ये एकूण कर्मचाऱ्यांची संख्या 5 लाखांहून अधिक आहे. कंपनीने असेही सांगितले की आर्थिक भरपाईची गतीही FY22 मध्ये समान राहील आणि या वर्षी 40,000 हून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती केली जाईल.

Rebegin साठी असा करा अर्ज

सुरुवातीला TCS च्या करिअर पोर्टलवर जा. यानंतर Rebegin या लिंकवर नेव्हिगेट करा. यानंतर ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा. यानंतर Apply वर क्लिक करा.

हे स्किल्स असणं आवश्यक SQL Server DBA, Linux Administrator, Network Admin, Mainframe Admin, Automation Testing, Performance Testing Consultant, Angular JS, Oracle DBA, Citrix Administrator, Java Developer, Dotnet Developer, Android Developer, IOS Developer, Windows Admin, Python Developer and PL SQL.यापैकी कोणत्याही कोर्समध्ये शिक्षण झालं असेल तर तुम्ही या जॉब्ससाठी अप्लाय करू शकता.

Bumper TCS Jobs: Golden Opportunity! Bumper Recruitment through TCS’s Rebegin Initiative; Apply for Rebegin

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण