वृत्तसंस्था
जेरुसलेम : गाझा पट्टीतून इस्राईलच्या दिशेने डागले जाणारे रॉकेट आणि इस्राईलकडून होणारे हवाई हल्ले हे गेल्या दोन दिवसांपासून दिसत असलेले चित्र आजही कायम होते. यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे बेळी जात आहेत. इस्राईलच्या ताज्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पॅलेस्टिनी नागरिकांची संख्या आता ७३ झाली असून यामध्ये १३ बालकांचा आणि दहा महिलांचा समावेश आहे. 73 died in Israeli air attack
इस्राईल-पॅलेस्टाईन यांच्यात २०१४ मध्ये झालेल्या ५० दिवसांच्या युद्धानंतरचा हा सर्वांत मोठा संघर्ष समजला जात आहे. जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीच्या आवारावर कोणाचा हक्क आहे, यावरून काही आठवड्यांपूर्वी संघर्ष उफाळून आला होता. ही जागा ज्यू आणि मुस्लिम या दोघांसाठी पवित्र असल्याने तिच्यावर ताबा मिळविण्यासाठी दोघांमध्ये तीव्र वाद आहे.
गेल्या आठवड्यात संघर्षाला आक्रमक रुप आले असून गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेकडून इस्राईलवर शेकडो रॉकेटचा मारा केला जात आहे. इस्राईलने क्षेपणास्त्र विरोधी यंत्रणा तैनात केली असली तरी रॉकेटच्या प्रचंड माऱ्यामुळे ही यंत्रणाही काही वेळा अपुरी पडत असून स्फोटांचे आवाज इस्राईलची राजधानी तेल अविवपर्यंत ऐकू येत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App