बदललेल्या स्वरुपातील कोरोना विषाणू भारतीय नाही, अपप्रचार थांबविण्याचे जगाला आवाहन


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली – जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालामुळे जगाच्या चिंतेचे कारण ठरलेला ‘बी.१.६१७’ हा बदललेल्या स्वरुपातील (व्हेरिएंट) कोरोना विषाणू भारतीय नाही.’’ असा दावा केंद्र सरकारने केला आहे. New corona virant Is not Indian clears Govt.

जागतिक आरोग्य संघटनेच्या  ३२ पानी अहवालात या नव्या अवताराबाबत कोठेही भारतीय शब्द वापरलेला नसल्याने माध्यमांमध्ये त्याबाबत प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या निराधार आणि खोडसाळपणाच्या असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आले.



भारतामध्ये मागील वर्षी आढळून आलेल्या कोरोनाच्या नव्या अवताराने जगभरातील ४४ देशांमध्ये हातपाय पसरल्याचे जागतिक आरोग्य संघटेनेने म्हटले आहे. या उपप्रकाराचा प्रसार सर्वांसाठीच चिंताजनक असल्याचेही संघटनेकडून सांगण्यात आले. जगभरातील कोरोना विषाणूच्या संसर्गावर जागतिक आरोग्य संघटना बारकाईने लक्ष ठेवून असून या विषाणूच्या बदलत चाललेल्या स्वरूपाची देखील वेळोवेळी नोंद घेतली जात आहे

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला ‘बी.१.६१७’ हा बदललेल्या स्वरुपातील कोरोना विषाणू कारणीभूत असल्याच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या निष्कर्षानंतर प्रमुख आंतरराष्ट्रीय तसेच देशांतर्गत प्रसारमाध्यमांमध्येही या अवताराला भारतीय असा टॅग लावण्यात आला होता. अमेरिका आणि ब्रिटनमधील आरोग्य यंत्रणांनीही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. हा अवतार कोरोना प्रतिबंधक लशींना दाद न देणारा आणि प्रतिपिंडे बनण्यास रोखणारा असल्याचा दावा त्यांनी केला आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने खुलासा केला.

New corona virant Is not Indian clears Govt.

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात