विशेष प्रतिनिधी
बीड : Santosh Deshmukh मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सध्या पोलिस कोठडीत असलेल्या सुदर्शन घुले, जयराम चाटे, महेश केदार, सुधीर सांगळे, प्रतीक घुले व सिद्धार्थ सोनवणे या 6 आरोपींना शनिवारी बीडच्या विशेष मकोका न्यायालयाच्या न्या. सुरेखा पाटील यांनी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.Santosh Deshmukh
तपासात सध्या पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याने एसआयटीच्या अपर पोलिस अधीक्षक किरण पाटील यांनी गरजेनुसार पुन्हा पोलिस कोठडी मागण्याचा हक्क अबाधित ठेवून आरोपींना न्यायालयीन कोठडी द्यावी, अशी विनंती केली होती. दुसरीकडे, केज न्यायालयात वाल्मीक कराडवरील खंडणीच्या गुन्ह्यात मांडलेल्या जामिनावर सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून सोमवारी (२० जानेवारी) ही सुनावणी होणार आहे.
मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला ४० दिवस झाले आहेत. या प्रकरणात सुरुवातीला सुदर्शन घुले, जयराम चाटे, प्रतीक घुले, सुधीर सांगळे, महेश केदार, कृष्णा आंधळे आणि विष्णू चाटे या सात जणांविरोधात खुनाचा गुन्हा नोंदवला गेला होता. तपासात सिद्धार्थ सोनवणे यानेही मदत केल्याचे समोर आल्याने त्यालाही आरोपी केले गेले होते. तर त्यानंतर मकोका लागू केल्यानंतर तपासात पोलिसांनी वाल्मीक कराडलाही या प्रकरणात आरोपी केले आहे. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या ९ झाली आहे. सध्या कृष्णा आंधळे वगळता ८ जण अटकेत आहेत.
शनिवारी व्हीसीद्वारे बीडच्या विशेषमकोका न्यायालयाने न्यायालयीनकोठडी सुनावल्यामुळे सहाही जणजामीन अर्ज करण्यासाठी पात्र झालेआहेत. मात्र खुनासह मकोकालागल्यामुळे त्यांच्या जामिनाचामार्ग कठीण आहे. मकोकामुळेजामीन मिळणार नाही. दरम्यान,वाल्मीक कराडला बीड शहरठाण्यात ठेवले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App