वृत्तसंस्था
नवी दिल्ली : दक्षिण अमेरिकन देश इक्वेडोरमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. रिश्टर स्केलवर त्यांची तीव्रता 6.7 इतकी नोंदवण्यात आली आहे. एजन्सीच्या म्हणण्यानुसार, ग्वायासमध्ये भूकंप इतका तीव्र होता की संपूर्ण शहरात त्याचे धक्के जाणवले. अनेक घरे आणि इमारतींचे मोठे नुकसान झाले असून 12 जणांचा मृत्यू झाला आहे.6.7-magnitude earthquake jolts Ecuador, killing 12
एबीसी न्यूजच्या वृत्तानुसार, भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले आणि रस्त्यावर आले. भूकंपाचा केंद्रबिंदू ग्वायासच्या दक्षिणेस 80 किमी अंतरावर असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, इक्वेडोरचे राष्ट्राध्यक्ष गिलेर्मो लासो यांनी सोशल मीडियावर संदेश जारी करून लोकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
इक्वेडोरच्या जोखीम व्यवस्थापन सचिवालयाने सांगितले की, कारमध्ये बसलेल्या एका व्यक्तीचा कुएनका येथे मृत्यू झाला. भूकंपाच्या वेळी तो कारमध्येच उपस्थित होता, तेव्हा अचानक घराचा ढिगारा त्याच्या अंगावर पडला आणि त्याचा मृत्यू झाला. याशिवाय एल ओरो या किनारी राज्यामध्ये आणखी तीन जणांचा मृत्यू झाला आहे. वेगवेगळ्या भागातून मृतांचा आकडा समोर येत आहे, त्यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो.
यापूर्वी तुर्कस्तानात विनाशकारी भूकंप
यापूर्वी तुर्कस्तानमध्ये झालेल्या भूकंपामुळे मोठा विध्वंस झाला होता. यामध्ये 50 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. 6 फेब्रुवारीला सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. पहाटे 4.17 वाजता भूकंपाचा पहिला धक्का बसला. रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 7.8 तीव्रता होती. या भूकंपाचा केंद्रबिंदू तुर्कस्तानच्या दक्षिणेकडील गाझियानटेप होता.
भूकंपामुळे 11 प्रांतात हाहाकार
लोक त्यातून सावरण्याआधी, थोड्या वेळाने दुसरा भूकंप झाला, रिश्टर स्केलवर त्याची तीव्रता 6.4 तीव्रता होती. भूकंपाच्या धक्क्यांचा हा काळ इथेच थांबला नाही. यानंतर 6.5 रिश्टर स्केलचा आणखी एक धक्का बसला. या भूकंपांनी मालत्या, सानलिउर्फा, उस्मानीये आणि दियारबाकीरसह 11 प्रांतांमध्ये हाहाकार माजवला होता.
एकापाठोपाठ 5 धक्के
यानंतर संध्याकाळी 4 वाजता आणखी एक भूकंप म्हणजेच चौथा धक्का बसला. या धक्क्याने सर्वाधिक विध्वंस घडवून आणला होता. यानंतर अवघ्या दीड तासांनी सायंकाळी साडेपाच वाजता भूकंपाचा पाचवा धक्काही बसला.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App