महाविकास आघाडी, शिवसेना-भाजप युतीत जागावाटपाच्या अद्याप चर्चाही नाहीत, पण माध्यमांनी ठिणग्या टाकून पेटवले वणवे!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका नोव्हेंबर 2024 मध्ये नियोजित आहेत. परंतु, शिंदे विरुद्ध ठाकरे संघर्ष सुप्रीम कोर्टात असताना त्याचा निकाल काय लागतो?, या वरही महाराष्ट्राचे राजकारण बरेच अवलंबून आहे. या पार्श्वभूमीवर भाजप – शिवसेना युती आणि महाविकास आघाडी या दोन्ही गोटांमध्ये लोकसभा – विधानसभा निवडणुकीची तयारी आणि चर्चा सुरू आहे. त्यातून जागा वाटपाच्या फॉर्मुल्याच्या ठिणग्या पडत आहेत. पण याच ठिणग्यांचे रूपांतर मराठी माध्यमांनी दोन्हीकडच्या गोटांमध्ये वणव्यांमध्ये केले आहे.Seat sharing formula not even discussed in MVA and Shivsena – BJP, but marathi media speculations are so high

 राष्ट्रवादीला अनुकूल रिपोर्टिंग

महाविकास आघाडीत राष्ट्रवादी काँग्रेसला अनुकूल असे रिपोर्टिंग करून मराठी माध्यमांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाला लोकसभेच्या 21, राष्ट्रवादीला 19 आणि काँग्रेसला सिंगल डिजीट मध्ये 8 जागा परस्पर देऊन टाकल्या. वास्तविक महाविकास आघाडीत जागावाटप फॉर्मुल्याची कोणतीही चर्चा झाल्याची अधिकृत बातमी नाही. फक्त महाविकास आघाडीतले तीनही घटक पक्ष महाराष्ट्रात एकत्रितरित्या जाहीर सभा घेणार असल्याचे त्यांनी अधिकृतरित्या सांगितले आहे. पण मराठी माध्यमांनी त्यांच्या सूत्रांच्या हवाल्याने राष्ट्रवादीला अनुकूल रिपोर्टिंग करून ठाकरे गटाला 21, राष्ट्रवादीला 19 आणि काँग्रेसला 8 जागा असा फॉर्म्युला ठरल्याच्या परस्पर बातम्या देऊन महाविकास आघाडीत काँग्रेसच्या गोटात त्या ठिणगीचा वणवा पेटवून दिला आहे.दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपच्या आयटी सेल मध्ये भाजप विधानसभेच्या 240 जागा लढवेल, असे सांगितले. त्याचा व्हिडिओ विशिष्ट पद्धतीने व्हायरल झाला. त्यामुळे शिंदे गटाला म्हणजेच शिवसेनेला विधानसभेच्या फक्त 48 जागा लढवण्याची संधी भाजप देणार असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या. त्यावर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आणि संजय गायकवाड, संजय शिरसाट या आमदारांनी शिवसेना 100 ते 125 जागा लढविणार असल्याचे स्पष्ट करून टाकले.

वास्तविक चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणताही फॉर्म्युला जाहीर केलेला नव्हता. 240 जागा हा भाजपच्या आयटीसी अंतर्गतचा मुद्दा होता. पण त्या ठिणगीचा माध्यमांनी शिवसेना – भाजपच्या युतीत युतीच्या गोटात वणवा पेटवून दिला.

प्रत्यक्षात ना महाविकास आघाडीत फायनल फॉर्म्युलावर चर्चा झाली आहे, ना शिवसेना-भाजप युतीमध्ये. पण माध्यमांची सूत्रे मात्र मधल्याच कुठल्यातरी पक्षासाठी कामाच्या बातम्या उचलून त्या पेरत आहेत. प्रत्यक्षात महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेसचे वरिष्ठ पातळीवरचे दिल्लीतले नेते यांच्यातच फक्त फायनल जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरेल आणि शिवसेना-भाजप युतीत भाजपचे केंद्रीय नेतृत्व, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातच जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावर फायनल चर्चा होईल.

पण यापैकी काँग्रेसच्या अतिवरिष्ठ गोटात भाजप आणि शिवसेनेच्या अतिवरिष्ठ गोटात माध्यमांच्या सूत्रांची डाळ शिजत नाही. सूत्रांची थोडीफार डाळ शिजते ती राष्ट्रवादीच्या गोटात. त्यामुळे माध्यमांना खऱ्या अर्थाने जागा वाटपाच्या फॉर्म्युल्याची बातमी ही अधिकृत तर सोडाच, सूत्रांच्या हवाल्यानेही 100% बरोबर मिळत नाही.

 लटकलेली सूत्रे

भाजपच्या राजवटीच्या काळात मराठी माध्यमांची सूत्रे मधल्या मध्ये लटकलेली आहेत. ती जागा वाटपाच्या फॉर्म्युलाच्या बातम्यांमुळे आणखीन खाली येऊन लटकल्याचेच दिसून येते. माध्यमांच्या सूत्रांना दिल्लीतून खरी बातमी मिळते, ना मुंबईतून. त्यामुळेच आपल्या लटकत्या सूत्रांच्या हवाल्याने मराठी माध्यमांनी महाविकास आघाडी आणि शिवसेना भाजप युती यांच्यातल्या जागा वाटप फॉर्मुल्याच्या ठिणग्या पाडल्या आणि त्यातून दोन्ही गोटात वणवे पेटल्याचे दाखविले आहे.

Seat sharing formula not even discussed in MVA and Shivsena – BJP, but marathi media speculations are so high

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”