विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सोशल मीडिया सॅव्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्हॉट्सअप चॅनेलचे आठवडाभरात तब्बल 50 लाख फॉलोवर्स झाले आहेत. स्वतः मोदींनीच या चॅनेलवर याची माहिती दिली आणि फॉलोवर्स आभार मानले. 50 lakh followers of Modi’s WhatsApp channel in eight weeks
माझ्या व्हॉट्सअप चॅनेलवर आठवडाभरातच 50 लाखांपेक्षा जास्त फॉलोवर्स झाले. जे मला या माध्यमाद्वारे कनेक्ट झाले त्यांचे मी आभार मानतो. आपण नेहमीच असे एकमेकांशी कनेक्ट राहू. वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहू, असे आवाहनही पंतप्रधान मोदींनी या निमित्ताने केले आहे.
पंतप्रधान मोदी हे वेगवेगळ्या सोशल मीडिया चॅनेलवर लोकप्रिय आहेत. किंबहुना जगातले ते सध्या टॉप रेटिंग असलेले नेते आहेत. सोशल मीडियाचा आपल्या सर्व कार्यक्रमांमध्ये परिणामकारक वापर करण्यात ते सर्वात आघाडीवर असलेले जागतिक नेते आहेत. वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संस्था नियमितपणे घेत असलेल्या लोकप्रियतेच्या चाचणीत मोदी आतापर्यंत कुठेच मागे पडलेले दिसत नाहीत. सध्या त्यांचे आंतरराष्ट्रीय चाचण्यां मधले रेटिंग 74 % आहे. मेन स्ट्रीम मीडियाचा वापर करण्यापेक्षा मोदी सोशल मीडिया वापराला अधिक प्राधान्य देतात आणि त्यांना सोशल मीडियावरही प्रतिसाद उत्तम मिळतो हे त्यांच्या फॉलोवर्सच्या संख्येतून स्पष्ट होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App